साताऱ्यात ठोसेघर सज्जनगड परिसरातील बोरडे घाटात डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना एका तरुणीचा तोल गेला आणि ती २५० फुट खोल दरीत कोसळली. सुदैवाने, ४० फुटावर एका झाडात अडकली, त्यामुळे तिचा जीव वाचला…
पुण्यातील वारजे येथील नसरीन अमीर कुरेशी (२९) काही जण साताऱ्यातील संगमनगरमध्ये कारने आले होते. हे सर्वजणांनी ठोसेघर येथे भटकंती केली. परंतु ठोसेघर धबधबा बंद होता. त्यामुळे बोरणे घाटात आल्यावर सर्वजण गाडीतून उतरुन फोटोसेशन करु लागले. नसरीन सेल्फी घेत असताना अचानक तिचा तोल गेला. त्यानंतर ती शंभर फूट खोल दरीत पडली.
या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणीला सुखरूप बाहेर काढले. तिला साताऱ्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
डोंगर, दऱ्यात सेल्फी काढताना कळजी घ्या, युवती पडली शंभर फूट खोल दरीत, झाडात अडकल्याने वाचली pic.twitter.com/pOpyGZJLNE
— jitendra (@jitendrazavar) August 4, 2024
या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या तरुणीचा जीव वाचला असला तरी तिला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. या भागात संततधार पाऊस सुरू असल्याने जमीन अतिशय निसरडी झाली आहे, त्यामुळे ही घटना घडली.