Video : सुरतच्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याने बनवलं खास ‘राम मंदिर थीम’ नेकलेस 

सुरत : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिराबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र याबद्दल चर्चा सुरू असताना गुजरातमधील सुरतमध्ये राहणाऱ्या एका हिरे व्यापाऱ्याने राम मंदिराच्या थीमवर एक हिरे-चांदीचा डिझायनर नेकलेस तयार केला आहे. राम मंदिराच्या थीमवर बनवलेल्या या डिझायनर नेकलेसचा वापर हिऱ्यांबरोबरच चांदीचा वापर करण्यात आला आहे. या नेकलेसचा व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका हिरे व्यापाऱ्याने राम मंदिराबद्दल आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी हे नेकलेस तयार केले आहे. श्रद्धेचे प्रतीक म्हणून व्यापाऱ्याने हिरे आणि चांदीपासून एक डिझाइन तयार केले . राम मंदिर थीमचे हे डिझाइन बनवण्यासाठी 5 हजार हिरे आणि 2 किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. 40 कारागिरांनी मिळून 35 दिवसांत हे डिझाइन पूर्ण केल्याचे हिरे व्यापाऱ्याने सांगितले. या नेकलेसचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
या नेकलेसमध्ये भगवान राम यांच्याबरोबरच लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तीही बनवण्यात आल्या आहेत. हिरे व्यापाऱ्याने या तीन मूर्तींसोबत हनुमानाची मूर्तीही स्थापन केली आहे. या चार मूर्तींबरोबरच राम मंदिर थीमच्या नेकलेसभोवती बारासिंघाचा आकारही तयार करण्यात आला आहे.

 


राम मंदिराचे काम मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. सध्या मंदिर परीसरात सुरू असलेलं हे काम अंतिम टप्प्यात आहे. 22 जानेवारीरोजी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याम्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

या कार्यकर्मासाठी तयारी देखील जोरात सुरू आहे. तसेच या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांकरिता स्पेशल रेल्वेंची देखील सोय करण्यात आली आहे. या दिवशी देशभरातून स्पेशल ट्रेन अयोध्येला येणार आहेत.