नंदुरबार : भारतीय जनता पार्टी संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी उत्तर महाराष्ट्राच्या 3 दिवसीय दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत नगर, शिर्डी, नाशिक, जळगांव, धुळे, मालेगांव व नंदुरबार या जिल्हयात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठकीचे आयोजन केले असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी प्रसिध्द दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासमवेत उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवि अनासपुरे देखील बैठकींना मार्गदर्शन करणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पार्टीचे संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान गेल्या दोन महिन्यापासुन सुरु आहे. यात राज्यात दिड कोटी भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य करण्याचे पक्षाचे अध्यक्ष महसुल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांनी जाहीर केले आहे. आत्तापर्यंत एक कोटी 46 लाख भारतीय जनता पार्टीचे सदस्य झालेले आहे. तर उत्तर महाराष्ट्रात 25 लाख भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य झाले आहे. हा एक इतिहास आहे. 5 एप्रिल पर्यंत 1 कोटी 51 लाख उददीष्ट पूर्ण करावयाचे आहे. याशिवाय भाजपा स्थापना दिनानिमित्त राज्यात 1 हजार 149 मंडलात 12 लाख कार्यकर्ते स्थापना दिनानिमित्त दुपारी 2 वा आप-आपल्या मंडलावर राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन संवाद ऐकणार आहे.
याशिवाय आगामी कार्यक्रमांच्या अनुषंगाने भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी तथा उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवि अनासपुरे हे दिनांक 5 एप्रिल या दरम्यान उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. यात 3 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वा नगर जिल्हा पदाधिकारी बैठक, दुपारी 4 वा शिर्डी लोकसभा पदाधिकारी बैठक, 4 एप्रिल रोजी नाशिक येथे सकाळी 10.00 वा संघटनात्मक तिघेही जिल्हयाची एकत्र बैठक भाजपा कार्यालय नाशिक येथे होणार आहे.
तर 5 एप्रिल रोजी जळगांव येथे सकाळी 10.00 संघटनात्मक तिघेही जिल्हयाची एकत्र बैठक तर त्याचदिवशी दुपारी 4 वा धुळे येथे धुळे व मालेगांव जिल्हा पदाधिकारी बैठक तसेच 6 एप्रिल रोजी भाजपा स्थापना दिनानिमित्ताने नंदुरबार येथे भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळावा कन्यादान मंगल कार्यालय येथे दुपारी 12 वा, असा हा उत्तर महाराष्ट्राचा भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचा दौरा असणार आहे. वरील सर्व बैठकीस जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा निवडणुक प्रभारी, प्रवासी कार्यकर्ते, मंडळ निवडणुक अधिकारी, मंडल अध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष यांनी बैठकीस उपस्थित रहावे अशी विनंती जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी केली आहे.