मुंबई : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतली होती. यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला होता. ते सातत्याने अजित पवारांवर टीकास्त्र सोडत होते. मात्र शिवतारेंनी त्यांची तलवार म्यान केली आहे. बुधवारी वर्षा बंगवल्यावर महायुतीतील या तीनही प्रमुख नेत्यांची शिवतारेंसोबत बैठक झाली. बैठकीवेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हेदेखील उपस्थित होते.
विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद मिटला असून त्यांच्यात मनोमिलन झाल्याची माहिती समोर येत आहे. काल (बुधवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विजय शिवतारेंची विशेष बैठक पार पडली.
तेथेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे विजय शिवतारेंचं बंड शमल्याची चर्चा सुरू आहे. या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन शिवतारे आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडणार आहेत. त्यामुळे बारामती मतदारसंघातील वाद शमल्याची चिन्ह आहेत.
#WATCH | Shiv Sena leader Vijay Shivtare met Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CMs Devendra Fadnavis & Ajit Pawar, in Mumbai. pic.twitter.com/NeQUtU0e7p
— ANI (@ANI) March 28, 2024