पंढरपूर : राज्यातील राजकीय नेते सध्या जोरदार चर्चेत आहे. रोजच कुणी कुणावर आरोप करतंय तर कुणी टीका. शरद पवार यांनी कसबा पोटनिवडणुकी नंतर राज्यात बदलाचे वारे वाहत असल्याचे म्हटलं आहे. त्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले पाटील?
कुठलेही बदलाचे वारे नाहीत. उगाच भविष्यकार होऊन रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसणाऱ्यांची उपासमार का करता? असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कसबा पोटनिवडणुकी नंतर राज्यात बदलाचे वारे वाहत असल्याचे म्हटलं आहे. त्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांनी पंढरपूरात मविआ आणि पवार यांच्यावर टीका केली.
राधाकृष्ण विखे-पाटील राज्यात कुठलेही बदलाचे वारे नाहीत. किंवा जनतेच्या मनात तशी कोणती इच्छा नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक भविष्यकार तयार होत आहेत. सध्या फक्त भाजपात इन कमिंग सुरू आहे. त्यामुळे अजून काही नेते भाजपात दाखल होतील असा सूचक इशारा विखे पाटील यांनी दिला आहे.
राज्यात लवकरच या अधिवेशनात वाळू आणि खडी धोरण तयार केले जाईल. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडेल असे वाळू खडी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते आज पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.