Vikrant Massy : विक्रांत मेस्सीचा बॉलिवूडला ‘अलविदा’, चाहत्यांना पडला एकच प्रश्न

#image_title

Vikrant Massey Announce Retirement : अभिनेता विक्रांत मेस्सी याने अचानक बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतलाय. मॅसीच्या अचानक झालेल्या या घोषणेने चाहत्यांची मनं तुटली आहे. तसेच मॅसी करिअरच्या शिखरावर असताना एवढा मोठा निर्णय का घेतला ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जाणून घेऊयात यासंदर्भात…

आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये विक्रांतने लिहिले, ‘नमस्कार, गेली काही वर्षे आणि त्यापूर्वीची वर्षे खूप चांगली गेली आहेत. तुमच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. पण जसजसा मी पुढे जातो तसतसं मला समजतंय की आता घरी जाण्याची वेळ आली आहे. पती, वडील आणि मुलगा म्हणून. आणि अभिनेता म्हणूनही. त्यामुळे येत्या 2025 मध्ये आपण एकमेकांना शेवटचं भेटणार आहोत. शेवटच्या 2 चित्रपटांच्या आणि अनेक वर्षांच्या आठवणी. पुन्हा धन्यवाद. प्रत्येक गोष्टीसाठी तुमचा सदैव ऋणी आहे.’

का सोडली इंडस्ट्री ?
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत ‘द साबरमती रिपोर्ट’ च्या प्रमोशन दरम्यान त्याने आपली भीती शेअर केली होती, ज्यामुळे चित्रपटामुळे वाद निर्माण झाला होता. यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत विक्रांतने सांगितलेलं की, त्याला सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून धमक्या येत होत्या, ज्यामध्ये त्याच्या नवजात मुलालाही लक्ष्य करण्यात आलं होतं. तो म्हणाला की, मला व्हाट्सअपवर धमक्या येतायत. त्या लोकांना माहितीये की मी एका ९ महिन्याच्या मुलाचा बाप आहे. माझा मुलगा अजून नीट चालू शकत नाही त्याला या सगळ्यात ओढलं जातंय. त्याची सुरक्षा मला चिंतेत टाकते. मला त्याची काळजी वाटते. आपण कोणत्या समाजात जगतोय. वाईट वाटतंय आणि भीतीही वाटतेय.