प्रसादातून गावकऱ्यांना विषबाधा, ५०हून अधिक आजारी

---Advertisement---

 

नंदुरबार : तालुक्यातील भिलईपाडा गावात प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. यात 50 हून अधिक स्त्रिया, मुले आणि ज्येष्ठ नागरिक आजारी पडले आहेत. या सर्व ग्रामस्थांना शासकीय जिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसून स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रसादातून विषबाधा झालेले घटनेची दखल घेत माजी आदिवासी विकासमंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी आरोग्य यंत्रणेला तातडीने कार्यरत केले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित व माजी सदस्य अर्चना गावित यांनीही रुग्णालयाला भेट देऊन बाधित ग्रामस्थांची विचारपूस केली आणि मदत कार्याला गती दिली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील एका धार्मिक कार्यक्रमात वितरित प्रसादातूनच विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे 20 हून अधिक ग्रामस्थांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उर्वरित नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितले की, विषबाधा प्रसादातून किंवा पाण्यातून झाली असावी. त्यामुळे गावातील पाणीपुरवठ्याचे नमुने तपासण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयात बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डाची व्यवस्था करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आमदार डॉ. विजयकुमार गावित हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून असून गावकऱ्यांना तात्काळ सहकार्य व मदत करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---