Vinesh Phogat Case : विनेश फोगाटला रौप्यपदक मिळणार की नाही, आज होणार निर्णय

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रतेप्रकरणी मंगळवार, १३ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजेपर्यंत न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे. विनेशला रौप्यपदक मिळणार की नाही, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.

7 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम फेरीच्या दिवशी सकाळी 1248304 अपात्र ठरवण्यात आले, त्यानंतर तिने त्याच संध्याकाळी CAS कडे अपील केले. तेव्हापासून विनेशसह संपूर्ण देश या निर्णयाची वाट पाहत होता, मात्र ‘दामिनी’ या हिंदी चित्रपटातील वकील सनी देओलप्रमाणेच विनेशलाही गेल्या काही दिवसांपासून केवळ ‘तारीख पे तारीख’ मिळाली आहे. आधी ऑलिम्पिक संपेपर्यंत यावर निर्णय घ्यायचा होता, आता हा निर्णय खेळ संपल्यानंतर 2 दिवसांनी येईल आणि तो दिवस आजचा, अर्थात 13 ऑगस्टचा आहे.

अखेर आज, म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजेपर्यंत या प्रकरणाचा निकाल येईल. याप्रकरणी (आपल्याला) सिल्व्हर मेडल देण्याची मागणी विनेशने केली आहे. एका दिवसापूर्वी उपांत्य फेरीसह तिचे सर्व तीन सामने 50 किलोच्या निर्धारित वजन मर्यादेत राहून खेळले होते आणि तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता, या आधारावर विनेशने ही मागणी केली आहे.

अंतिम सामन्याच्या दिवशीच तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे तिला केवळ अंतिम फेरीतूनच अपात्र ठरवण्यात यावे, संपूर्ण स्पर्धेतून नव्हे असं तिचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत तिला संयुक्तपणे सिल्व्हर मेडल मिळावं, अशी तिची मागणी आहे. मात्र तिच्या या मागणीवर काय निर्णय होतो, तिला सिल्व्हर मेडल मिळेल की नाही याचा निर्णय आज होईल.