---Advertisement---

५०० रुपयांच्या नोटा बंद होणार, व्हायरल मेसेजने गोंधळ; काय म्हणाले केंद्र सरकार ?

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १४ जुलै २०२५ । आरबीआयकडून दोन वर्षांपूर्वी २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, आता सोशल मीडियावर आणखी एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की मार्च २०२६ पासून ५०० रुपयांच्या नोटा चलनातून कमी केल्या जाणार आहे. परिणामी यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडालाय. दरम्यान, याबाबत केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

---Advertisement---

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मजकूरमध्ये असे म्हटले आहे की रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत त्यांच्या एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा काढणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांचे लक्ष्य ७५% बँकांच्या एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा काढून टाकण्याचे आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत ९०% एटीएममधून या नोटा पूर्णपणे बंद कराव्यात. यानंतर, एटीएममधून फक्त १०० आणि २०० रुपयांच्या नोटाच उपलब्ध होतील. त्यामुळे आतापासून तुमच्याकडे असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा वापरण्यास सुरुवात करा.

दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेकने हा मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की रिझर्व्ह बँकेने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही आणि ५०० रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीररित्या वैध आहेत.

पीआयबीचे नागरिकांना आवाहन

पीआयबीने नागरिकांना अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांपासून सावध राहण्यास सांगितले आहे. पीआयबी फॅक्ट चेक युनिटने कोणत्याही माहितीची सत्यता तपासण्यासाठी सरकारी वेबसाइटसारख्या विश्वसनीय स्रोतांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, जर कोणताही संदेश संशयास्पद वाटत असेल तर त्याबद्दल तक्रार करा जेणेकरून चुकीच्या माहितीचा प्रसार थांबवता येईल, असे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---