---Advertisement---

Viral Video : ..अन् बायकोने नवऱ्याला लाथा बुक्क्यांनी धू धू धुतलं!

---Advertisement---

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. दररोज काहीना काही व्हायरल होत असते. यातील काही व्हिडीओ खळबळ उडवून देणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. पण, हा व्हिडिओ इतर व्हिडिओंपेक्षा वेगळा आहे, कारण यात बायको नवऱ्याची धु-धु धुलाई करताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कामावरुन (ऑफिसमधून) घरी आल्याचे दिसत आहे. घरात पाऊल ठेवताच यावेळी अचानक त्याची बायको त्याच्यावर तुटून पडते. ती त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करते. ही संपूर्ण घटना घरात लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाणीसह बायको त्याला शिवीगाळही करताना दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर Crazy Clips नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

या मारहाणीमागे नेमके काय कारण असावे असाच प्रश्न प्रत्येकाला पडल्याचे दिसत आहे. अनेकांनी पती उशिरा आल्याने पत्नी संतापल्याचे म्हटले आहे. तर काही जणांनी तो जाताना कचऱ्याचा डबा विसरून गेल्याने बायकोने धुतल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी बिचाऱ्या नवऱ्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. तर काही जणांनी भावा आम्हीही हे सहनं केलयं म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

https://twitter.com/i/status/1654912914279522304

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment