Viral Video : इंटरनेटच्या या युगात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे पाहिल्यानंतर अनेकवेळा आपल्याला हसू आवरता येत नाही, तर कधी कधी असे काही घडते. जे पाहून आपण आश्चर्यचकित होतो. पण बहुतेक वेळा इथे असंच काहीसं पाहायला मिळतं. जे पाहिल्यानंतर डोळ्यांवर विश्वास ठेवणं थोडं कठीण वाटतं. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्ही देखील कराल ‘सॅल्यूट’.
भारतीय सैन्याने काश्मिरातील बडगाम येथे दोन दहशतवाद्यांचे सरेंडर करवून घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सैन्य दलातील जवानांनी बेटा बेटा म्हणून या दहशतवाद्यांना आधार दिला आणि त्यांचे शस्त्र खाली ठेवून त्यांना सरेंडर करण्यास भाग पाडले आहे.
दरम्यान, ही घटना जम्मू काश्मीर भागातील बडगाम येथे घडली आहे. या परिसरात सर्वांत जास्त दहशतवादी हल्ले होत असतात. हा व्हिडिओ १६ ऑक्टोबर २०२० चा असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय सैन्यांनी या दहशतवाद्यांना न मारता त्यांना वाचवलं आहे. यानंतर एक दहशतवादी भारतीय सैन्यांचे आभार मानताना दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/Ct5qbWhokkH/?utm_source=ig_web_copy_link
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील सैन्यांच्या आवाजानुसार जहांगीर असं एका दहशतवाद्याचं नाव असून त्याने अंगावरील कपडे काढून टाकले आहेत. तर सैन्यातील कमांडोंनी “शब्बास बेटा, आ जाव, आ जाव” म्हणत त्याला सरेंडर करवून घेतलं आहे. त्याचबरोबर या आतंकवाद्याच्या चुलत्याला सुद्धा सरेंडर करण्यास भारतीय सैन्य दलाने भाग पाडले आहे.
दरम्यान, भारतीय सैन्य दलाचा हा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून सैन्य दलाचे कौतुक नेटकऱ्यांकडून केले जात आहे. तर “जम्मू काश्मीर भागातील दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी सैन्य दलातील जवान आपल्या जीवाची बाजी लावून लढत असतात, त्यांना कडक सॅल्यूट” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.