बीड : हिंगणी (ता.धारुर) येथील एका शाळेतील शिक्षिका आणि खिचडी शिजवणारी महिला या दोघींमध्ये होणाऱ्या भांडणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात त्या अक्षरशः एकमेकींचे केस ओढताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, दर्जेदार आहार देत नसल्याचा जाब महिला शिक्षिकाने विचारल्यावर खिचडी शिजवणाऱ्या महिलेने ही मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.
जोड हिंगणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. दरम्यान याच शाळेतील पहिली ते चौथी वर्गात अंदाजे 60 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे सरकारकडून या मुलांना आहार दिला जातो. पण, येथील विद्यार्थ्यांना खिचडी शिजवणाऱ्या महिलेकडून दर्जेदार आहार दिला जात नसल्याचा आरोप आहे. हा सर्व प्रकार नेहमीचाच झाल्याने येथील एका महिला शिक्षिकेने शनिवारी खिचडी शिजवणाऱ्या महिलेस विद्यार्थ्यांना पोट भरुन पोषण आहार देण्याची मागणी केली. त्यामुळे याचा संबंधित महिलेला राग आला. त्यामुळे खिचडी शिजवणाऱ्या महिलेने या शिक्षिकेसोबत हुज्जत घालायली सुरुवात केली.
पतीसोबत शाळेत आलेल्या या महिलेने शिक्षिकेसोबत वाद घातल्यावर थेट हाणामारी सुरु केली. वाद एवढा वाढला की या दोघींनी एकमेकांचे केस धरले. तसेच मारहाण देखील सुरु केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या इतर महिला त्यांचा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करत होत्या, मात्र दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. दोन्ही हातांनी केस पकडून एकमेकींना लाथा मारत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. शेवटी इतर महिलांनी मध्यस्थी करत त्यांना सोडवले.
https://www.facebook.com/watch/gavhanepatil.santosh/?ref=embed_video