IND vs AUS : सिराजनंतर विराट कोहलीला बसला फटका, आयसीसीने केली कारवाई

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सॅम कॉन्स्टासच्या पदार्पणाने चांगला ठसा उमठवला. त्याने पॅटियन्सीने खेळ करत भारताच्या गोलंदाजांना तगडी लढत दिली.

 

दरम्यान, विराट कोहलीने सॅम कोनस्टासला धक्का दिल्यामुळे त्यावर कारवाई करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या आक्रमक वर्तनामुळे त्याला आयसीसीच्या नियमांचा फटका बसला आहे. आयसीसीच्या नियमांनुसार त्याला सामना फीच्या 20 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट मिळाले.

मोहम्मद सिराजलादेखील आयसीसीने डिमेरिट पॉइंट दिला होता. ॲडलेड कसोटीत ट्रॅव्हिस हेडसोबत वाद केल्यामुळे त्याला दंड आणि एक डिमेरिट पॉइंट मिळाले होते.

आयसीसीच्या नियमांनुसार, 24 महिन्यांच्या कालावधीत 4 डिमेरिट पॉइंट्स मिळाल्यास, खेळाडूवर बंदी घालण्यात येऊ शकते. त्यामुळे विराट कोहलीसाठी पुढील काळात शिस्तीचे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पहिल्या दिवसाच्या अखेरीस, ऑस्ट्रेलिया ८६ षटकांत ६ बाद ३११ धावा करत, मजबूत स्थितीत दिसत आहे. कॉन्स्टास, ख्वाजा आणि लॅबुशेन यांचा योगदान मोठं होतं, ज्यात ख्वाजा आणि लॅबुशेन यांनी अर्धशतक केले. स्टीव्ह स्मिथ ६८ धावांवर नाबाद आहे.