Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सोमवारी अचानक कसोटी क्रिकेमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. रोहित शर्मापाठोपाठ विराटनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. कोहलीने १२३ कसोटी सामन्यांत ३० शतकं व ३१ अर्धशतकं झळकावली आहेत आणि त्याने ९२३० धावा केल्या आहेत.
विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या निर्णयाची माहिती दिली. त्याने लिहिले, “आज मी पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये बॅगी ब्लू घालल्याला १४ वर्षे झाली आहेत. खरे सांगायचे तर, हा प्रवास मला कुठे घेऊन जाईल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला आकार दिला आणि मला असे धडे दिले जे मी आयुष्यभर लक्षात ठेवेन.”
३६ वर्षीय विराट कोहलीने १२३ कसोटी सामन्यांमध्ये ३० शतकांसह ९२३० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४६.८५ आहे. कोहलीने भारतीय क्रिकेटला अनेक महत्त्वाचे विजय मिळवून दिले आणि आपल्या कठोर परिश्रम आणि संघर्षाने कसोटी क्रिकेटमध्ये एक नवीन ओळख निर्माण केली.