---Advertisement---
Virat Kohli : टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत लंडनमध्ये चर्चेत आहे. अलिकडेच हे स्टार कपल विम्बल्डन २०२५ चा एक हाय-प्रोफाइल टेनिस सामना पाहण्यासाठी पोहोचले होते, जिथे विराट टेनिस दिग्गज नोवाक जोकोविचला पाठिंबा देताना दिसला. दरम्यान, विराट कोहली लॉर्ड्स कसोटीत दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट-अनुष्का लंडनमधील सेंट जॉन्स वुड परिसरात राहतात. दुसरीकडे, विम्बल्डन सामने लंडनमधील ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोकेट क्लबमध्ये खेळले जात आहेत, जे विराटच्या घराजवळ आहे. ज्यामुळे तो सामना पाहण्यासाठी येथे आला होता. अशा परिस्थितीत, आता तो टीम इंडियाचा सामना पाहण्यासाठी देखील पोहोचेले, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---Advertisement---
भारत आणि इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. हे मैदान देखील सेंट जॉन्स वुडमध्ये आहे, जे कोहलीच्या तात्पुरत्या निवासस्थानापासून थोड्या अंतरावर आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना आशा आहे की सध्या भारतीय कसोटी संघाचा भाग नसलेला विराट स्टँडवरून त्याच्या तरुण संघाला प्रोत्साहन देण्यासाठी या सामन्यात पोहोचू शकेल. जर कोहली लॉर्ड्सवर आला तर तो केवळ खेळाडूंसाठीच नाही तर चाहत्यांसाठीही एक मोठा क्षण असेल.
विम्बल्डन २०२५ दरम्यान, विराट कोहलीने स्टार स्पोर्ट्सशी खास संवाद साधला. यादरम्यान, कोहली म्हणाला की त्याचा स्वप्नातील अंतिम सामना जोकोविच आणि दोन वेळा गतविजेता स्पॅनिश स्टार कार्लोस अल्काराज यांच्यात होईल. तो म्हणाला, ‘मला कार्लोस अल्काराज) आणि नोवाकने अंतिम फेरीत पोहोचावे आणि नोवाकने विजेतेपद जिंकावे असे वाटते, कारण त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर ते त्याच्यासाठी जबरदस्त असेल.’
याशिवाय, विराट कोहली म्हणाला, ‘वेगवेगळ्या खेळांमध्ये वेगवेगळी आव्हाने असतात. क्रिकेटमध्ये, एक आव्हान म्हणजे तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागते, तुम्ही सकाळी वॉर्म अप करता आणि नंतर परत येऊन ड्रेसिंग रूममध्ये वाट पाहता, कारण तुम्हाला माहित नसते की तुम्ही कधी फलंदाजी करणार आहात. तिथे बसून, खेळ वाचताना, परिस्थिती खूप वेगाने बदलते. टेनिसमध्ये, तुमच्याकडे कदाचित काही अटी असतात, तुम्हाला माहिती असते की तुम्ही काय करत आहात.’ तथापि, त्यांनी असेही म्हटले की विम्बल्डन सेंटर कोर्टवर खेळणे हा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळण्यापेक्षा अधिक भीतीदायक अनुभव मानला जाऊ शकतो कारण गर्दी खेळाडूंच्या जवळ असते.