दक्षिण अफ्रिकेत ‘राम सिया राम’ गाणं वाजताच, विराटनं केलं असं काही, सर्वच अवाक्‌

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहचलाय. या सामन्यात गोलंदाजांच्या तुफान माऱ्यासह अजून एकाची चर्चा होतेयं. ती म्हणजे, विराट कोहलीच्या कृतीची! अफ्रिकेचा खेळाडू केशव महाराज फलंदाजीला आल्यानंतर राम सिया राम हे गाणं वाजलं. त्यानंतर विराट कोहलीने केलेली रिअॅक्शन चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

दक्षिण आफ्रिकाची फलंदाजी सुरु असताना 16 व्या षटकात ही घटना घडली. जेव्हा दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 34 धावांवर सहावी विकेट गमावली. मार्को यान्सन (0) बाद झाल्यानंतर केशव महाराज क्रीजवर पोहोचला. भारतीय वंशाचा केशव महाराज हा श्री राम आणि हनुमानजींचा भक्त आहे. केशव महाराज क्रिझवर आल्यानंतर मैदानावर राम सिया राम, हे गाण वाजू लागले. यादरम्यान विराट कोहलीने धनुष्य-बाणाचे हावभाव केले आणि प्रेक्षकांना हात जोडून अभिवादन केले. विराट कोहलीची ही रिअॅक्शन चर्चेत आहे.

भारत आणि आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघाचा पहिला डाव आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 55 धावांत आटोपला. मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. 55 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताचाही डाव कोसळला. केपटाऊन कसोटीच्या पहिल्याच दिवशी तब्बल 23 फलंदाज तंबूत परतले, हा एक विक्रमच झालाय.