विवो V 27 भारतात ‘या’ दिवशी होणार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

तरुण भारत लाईव्ह । २० फेब्रुवारी २०२३। विवो या स्मार्टफोनची V 27 हि सिरीज भारतात लाँच केली जाणार आहे. हा स्मार्टफोन आपल्याला कोणते फीचर्स देतो आणि हा स्मार्टफोन नक्की केव्हा लाँच केला जाईल तसेच या स्मार्टफोनची किंमत काय असेल हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मिळालेल्या माहितीनुसार, विवो या स्मार्टफोनची V 27 हि सिरीज भारतात लाँच केली जाणार आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स असे असतील कि या स्मार्टफोन मध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा ३डी डिस्प्ले असेल. विवो V 27  हा भारतात लाँच होणारा पहिला स्मार्टफोन असणार आहे. हा स्मार्टफोन दोन मेमरी व्हेरिएंट मध्ये येऊ शकतो यामध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७२०० चिपसेटवर काम केले जात आहे. या स्मार्टफोन मध्ये ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज आणि २५६ जीबी स्टोरेज सोबत उपलब्ध होईल. या स्मार्टफोन च्या कलर बद्दल बोलायचे झाल्यास हा स्मार्टफोन ब्लॅक आणि चेंजिंग ब्लु मध्ये आणला जाऊ शकतो.

विवो V 27 या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास हा स्मार्टफोन २७ हजारच्या जवळपास याची किंमत असू शकते. विवो V 27 हा भारतात १ मार्च २०२३ ला लाँच केले जाईल. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.