आला नवीन स्मार्ट टीव्ही, आवाजाने चालू-बंद होणारा, फक्त इतक्या रुपयांत करा खरेदी

तरुण भारत लाईव्ह । १४ मार्च २०२३ । शाओमी ने भारतात रेडमी ब्रँड अंतर्गत नवीन स्मार्ट फायर टीव्ही ३२ इंचाचा लाँच केला आहे. Redmi Smart Fire TV 32 कंपनीचा देशातील पहिला स्मार्ट टीव्ही आहे. जो Fire TV OS सोबत येतो. Amazon Fire OS च्या टीव्ही सोबत रेडमीने अलेक्सा व्हाइस सपोर्टचा रिमोट सुद्धा दिला आहे. जाणून घेऊयात या स्मार्टटीव्ही चे फीचर्स आणि किंमत तरुण भारतच्या माध्यमातून.

चीनची कंपनी शाओमीने भारतात एक खास स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. हा टीव्ही आवाजाने चालू आणि बंद करता येणार आहे. या स्मार्ट टीव्हीत ३२ इंचाचा रेडी डिस्प्ले, २० वॉट स्पीकर्स, डॉल्बी ऑडिओसारखे फीचर्स दिले आहेत. लेटेस्ट रेडमी स्मार्ट फायर टीव्हीत Prime Video, Netflix, Disney+ Hotstar, Zee5, SonyLiv, YouTube सारख्या अॅप्सचा सपोर्ट दिला आहे.

या स्मार्ट टीव्हीचा रिझॉल्यूशन1366×768 पिक्सल आहे. स्क्रीन 178 डिग्री व्यूइंग अँगल, विविड पिक्चर इंजिन, ऑटो लो लँटेंसी मोड, 6.5ms रिस्पॉन्स टाइम ऑफर करते. स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 96.9 टक्के आहे. Redmi Smart Fire TV 32 इंच मध्ये 1.5 गीगाहर्ट्ज़ क्वॉड-कोर कॉर्टेक्स ए35 प्रोसेसर दिले आहे. ग्राफिक्ससाठी माली-G31 MP2 GPU मिळतो. या टीव्हीत १ जीबी रॅम आणि ८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. रेडमीच्या या टीव्हीत व्हॉइस रिमोट मिळतो. अलेक्सा बटन सपोर्ट सोबत येतो. टीव्हीत प्ले बॅक कंट्रोल, चॅनेल अप – डाउन, म्यूट बटन शिवाय, Netflix, Amazon Prime Video आणि Amazon Prime Music साठी वेगळे बटन दिले आहे.

रेडमी स्मार्ट फायर टीव्ही ३२ इंच टीव्हीची किंमत भारतात १३ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, लाँचिंग ऑफर मध्ये Mi.com आणि Amazon.in वरून या टीव्हीला १ हजार रुपयाच्या सूट सोबत खरेदी करता येवू शकते. याशिवाय, १ हजार रुपयाची अतिरिक्त सूट मिळते. याचाच अर्थ हा टीव्ही फक्त ११ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता.