---Advertisement---

Assembly Election 2024 । हिंदुत्वाच्या रक्षणासाठी महायुतीला कौल द्या, कुणी केलं आवाहन ?

---Advertisement---

Assembly Election 2024 । राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. राज्यात २८८ तर जळगाव जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात सार्वत्रिक निवडणूक होत असून बुधवार, २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात लाडक्या बहिणींसह सर्वांनीच हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी महायुतीला मतदान करावे, असे आवाहन भाजपच्या ज्येष्ठ नेत्या चित्रा वाघ यांनी केले.

महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे मदत दिली ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या पोटात सूड उठलेत म्हणून कोर्टात ही गेलेत मात्र त्यांनी कितीही स्टंटबाजी केली आणि तिथेही दिशाभूल केली तरी लाडक्या बहिणीचे पैसे कधीही बंद होणार नाहीत. उलट महायुती सरकार सत्तेत आल्यावर आता 2100 रुपये प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्याचा संकल्प महायुतीने घेतलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी या महायुतीच्या पाठीशी उभ्या राहतील, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीतील आमचे सावत्र भाऊ तर बहिणीच्या वाईटावर बसलेले आहेत मात्र आमच्या बारामतीच्या मोठ्या ताई संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे या लाडक्या बहिणीच्या विरोधात बोलतात आणि सावत्र भाऊ खोट्यांचा सरदार राहुल गांधी मात्र आम्ही जे 2100 रुपये लाडक्या बहिणींना महायुती देणार आहोत तीच किंमत ते 3000 रुपये पर महिन्याला देऊ असे आवाहन करतात. मात्र हे पैसे कुठून आणणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र चे तिजोरी खाली झाली आहे असं म्हणणारे मात्र आता तीन हजार रुपये देऊ असे खोटे आश्वासन देतात म्हणून या खोटारड्यांना घरचा रस्ता दाखवा, असेही त्या म्हणाल्या.

सर्व हिंदू माता, बंधू व भगिनींनी एकत्रित येऊन येणाऱ्या 20 तारखेला आपला हक्क बजावा. मतदान केलं तरच हिंदुत्व वाढेल, असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले. या प्रसंगी डॉक्टर राजेंद्र फडके, डॉक्टर केतकी पाटील यांनी सभेला संबोधित केले. तर प्रारंभी सात बालिकांचे पूजन यावेळी करण्यात आले सभेला मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या अरविंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर आभार उमेश फेगडे तालुका भाजपा अध्यक्ष यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment