Assembly Election 2024 । मतदान प्रकियेस सुरुवात, यंदा मतदानाची टक्केवारी वाढणार का ?

Assembly Election 2024 । महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने जास्तीच जास्त मतदान व्हावे यासाठी सर्वाधिक भर हा मतदान जनजागृतीवर दिला असून, यंदा मतदानाची टक्केवारी वाढणार का ? याकडे लक्ष लागून राहणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३६ लाख ५५ हजार ३४८  मतदार आज बुधवारी मतदानाचा हक्क बजावून १३९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात ४ हजार ४१५  मतदान केंद्रे उभारण्यात आली असून मतदान सुरळीत पार पाडावे यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात मुख्यतः लढत होत आहे.

२८८ विधानसभेच्या जागांसाठी ७ हजार ०७८ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील २ हजार ९३८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ४ हजार १४० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

हा आकडा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी जास्त आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २८८ मतदारसंघांसाठी 3 हजार २३९ उमेदवार रिंगणात उतरले होते.

जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात सुमरे १३९ उमेदवार रिंगणात आहे. या उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद करणार आहे.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात ४ हजार ४१५  मतदान केंद्रे उभारण्यात आली असून मतदान सुरळीत पार पाडावे यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे.