तरुण भारत लाईव्ह । २३ जानेवारी २०२३। गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्ष या तिथीला येतो. या दिवशी गणपती बाप्पाचा जन्मदिवस साजरा होतो त्या दिवसाला तिळकुंद चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी तिळाचे खूप महत्व असते. या दिवशी व्रत केल्याने आपल्याला व्रताचे काय फळ मिळते आणि हे व्रत कसे करावे हे जाणून घेऊया तरुण भारत च्या माध्यमातून.
तिळकुंद चतुर्थीला दानाचे खूप महत्व असून या दिवशी तिळाचे दान करावे. गणेशाला तीळ अर्पण करावी. याशिवाय गरजू लोकांना वस्त्र, तीळ, शाल आणि जेवण दिले जाते. या दिवशी तिळापासून बनवलेल्या अन्नपदार्थांचे दान केल्याने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात. या दिवशी तिळकुंद चतुर्थीचे व्रत करावे या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. आणि स्वच्छ आसनावर बसून गणेशाची मनोभावे पूजा करावी. श्रीगणेशाची पूजा करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने बसावे. ओम गं गणपत्ये नमः या मंत्राचा एक माळ जप करावा. सायंकाळी श्रीगणेशाची आरती करावी.
तिळकुंद चतुर्थीच्या दिवशी हे व्रत केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच घरात सुख शांती निर्माण होते. स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते. आणि सर्व दुःख दूर होते. या दिवशी तिळाचे महत्व असल्याने याला तिळकुंद चतुर्थी असे म्हणतात.