वटाणा चाट! घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह ।०५ फेब्रुवारी २०२३। वटाणे सद्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. वटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते. वटाणे भाजीत घालायला आवडत नसेल तर वटाणा चाट हा पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता. वटाणा चाट घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
वटाणे, बटाटे, कांदा, कोथिंबीर, मीठ, जीरे, धणे, लाल तिखट.

कृती 
सर्वप्रथम रात्रभर पाण्यात वाटाणे भिजवून ठेवा. त्यानंतर वाटाणे आणि बटाटी चांगली उकडून घ्या. वाटाणे शिजवताना त्यात पाणी, हिंग आणि थोडंसे मीठ घाला. त्यानंतर चांगले कुस्करुन त्यात उकडलेले वाटाणे, बारीक चिरलेला कांदा, मीठ, कोथिंबीर, तिखट,  धणे आणि जिरे पावडर अथवा चाट मसाला घालून सर्व्ह करा मटार चाट.