जळगाव | ‘लव्ह जिहाद’ ही समस्या केरळपुरती मर्यादित नाही, भारतभर त्यांचा वणवा पेटला आहे. या समस्येला रोखण्यासाठी आपल्या घरातील धर्मसंस्कार मजबूत करा. धर्मसंस्कार देण्यात आपण कमी पडतो. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ला मुली बळी पडत असल्याचे ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे निर्माता विपुल शहा यांनी सांगितले.
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे निर्माता विपुल शहा हे ‘स्टोरी बिहाईंड केरता स्टोरी’ या विषयावर व्याख्यानात बोलत होते. सर्जना मीडिया सोल्युशन्स प्रा. ति. ‘जळगाव तरुण भारत ‘तर्फे शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयाजवळ क्रेझीहोम येथे १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांचे व्याख्यान झाले.
सुरुवातीला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे निर्माता विपुल शहा, सर्जना मीडिया सोल्युशन प्रा.लि.चे कार्यकारी संचालक रवींद्र लड्डा, प्रकल्प सहप्रमुख संजय नारखेडे, कांचन साने, अनिता नारखेडे, सुधा काबरा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच विद्या पाटील, अनिता कांकरिया यांनी शाल, श्रीफळ देऊन निर्माता शहा यांचे स्वागत केले. याआधी सर्जना मीडिया सोत्युशन प्रा.लि.चे कार्यकारी संचालक रवींद्र लखा यांनी ‘तरुण भारत’ राबवित असलेल्या विविध उपक्रमांसह दिवाळी अंकांच्या विषयावर प्रकाशझोत टाकला. ‘तरुण भारत’ हा राष्ट्रहित, राष्ट्र विचार घेऊन असे उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.
निर्माता विपुल शहा म्हणाले की, केरला स्टोरीने ज्या मुद्याला स्पर्श केला आहे. त्यांचा महिलांच्या जीवनात निश्चित प्रभाव पडला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून याबाबत जागृती होत आहे, ही बाब आशादायी आहे. मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करून त्यांचा दहशतवादी कारवायासाठी उपयोग करून घेणारा केरळमध्ये हा दहशतवादी ग्रुप कार्यरत आहे. माझा सुरुवातीला यावर विश्वास बसत नव्हता. मात्र मी प्रत्यक्षात केरळमध्ये जाऊन याची खात्री केली आणि त्यानंतर यावर चित्रपट बनविण्याचा निश्चय केल्याचे त्यांनी सांगितले.
केरळमध्ये जाऊन धर्मांतर झालेल्या अनेक मुलींना भेटलो. त्यांच्या व्यथा जाणून मी थक्क झालो. या मुली आश्रमात राहतात. त्या वापस घरी जात नाही. या मुलींना घरात वापस घेतले तर त्यांच्या घरच्यांना धमक्या दिल्या जातात, तर काही ठिकाणी त्यांचे कुटुंब त्यांना स्वीकारत नाही. परंतु आशाविद्या संस्थेने अशा सहा हजार मुलींना ‘लव्ह जिहाद’चा शिकार होण्यापासून रोखत्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहशतवादी संघटना योजना आखतात. मात्र मुलींना त्या गोष्टी समजत नाही. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपल्याला भ्रमित केले जात आहे. आपल्याला सावधान राहण्याची गरज आहे. धर्मनिरपेक्षतेची गोळी आपल्याला खाऊ घातली जाते. त्यामुळे सत्य आपण पाहू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
३२ हजारांच्या झालेल्या धर्मांतराच्या आकड्यावरून प्रसार माध्यमात खत झाता. मात्र त्याबाबतची सत्यता लोकांसमोर यावी, यासाठी १७ मिनिटांचा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला. देशातला हा आकडा योग्य आहे. केरळमधील’लव्ह जिहाद’ची व्याप्ती लक्षात घेता त्यातील पाच टक्केच मुद्दे चित्रपटाच्या माध्यमातून मांडते आहेत. केरला स्टोरी चित्रपटाविरोधात १२ जणांनी न्यायालयात अर्ज दाखल झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटांवर कोणत्याही राज्यात बंदी घालू नये, असे आदेश दिले होते. मात्र तरीही पश्चिम बंगालमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ देण्यात आला नाही. चित्रपटाला विरोध म्हणजे दहशतवादाचे एक प्रकारे समर्थन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सूत्रसंचालन प्रतिमा याज्ञिक यांनी केले. आभार प्रकल्प सहप्रमुख संजय नारखेडे यांनी मानले. यावेळी सर्जना मीडिया सोल्युशन्सचे संचालक रत्नाकर पाटील, अनिल भोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुलींना घराचा मार्ग वापसीसाठी खुला करा
आपल्या घरापर्यंत पोहचलेल्या ‘लव्ह जिहाद विरुध्दची लढाई आपत्यालाच लढावी लागणार आहे. त्यासाठी घरात मुलांवर संस्काराच्या बिजाची पेरणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. लहानपणापासून मुलांमध्ये धर्मसंस्काराची भावना रुजावा. त्यांच्याशी मोकळा संवाद साधला पाहिजे. त्यांच्याशी मित्राप्रमाणे चर्चा करा त्यांनी स्वतःहून सर्व बाबी तुमच्याकडे शेअर केल्या पाहिजे. ज्या मुती याता बळी पडल्या त्यांना आपल्या घराचा मार्ग वापसीसाठी खुला केला पाहिजे. मोठ्या मनाने त्यांना स्वीकारायला हवे, अन्यथा त्यांचे जीवन उद्ध्वस्त होते. मुलांना लहानपणापासून संस्कार दिले तर हे दिवस येणारच नाहीत. त्यासाठी आपण सावध राहणे गरजेचे असल्याचे शहा यांनी म्हटले.
षड्यंत्रापासून समाजाचे रक्षण करण्याची गरज
या षड्यंत्रापासून समाजाला वाचविले पाहिजे. ‘लव्हमॅरेज’ की ‘लव्ह जिहाद’ हा ट्रॅप विचार करून त्यांची खात्री केली पाहिजे. केरला स्टोरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राज्यात या घटनांची संख्या कमी होत आहे. पूर्ण भारतात ही समस्या आहे. त्यासाठी समाज संरक्षणासाठी काम करण्याची गरज आहे. सामजिक अडचण लक्षात घेता यावर काम करण्याची गरज आहे. समाजात ही बाब खोलवर रुजवावी लागेल. त्याअनुषंगाने त्यावर निरंतन काम करावे लागणार आहे. राष्ट्र, धर्म प्रथम याप्रमाणे आपण विचार ठेवायला हवे. आपल्या एक मताची ताकद मोठी आहे. त्या ताकदीचा आपण उपयोग केला पाहिजे. एकजुटीने कोण आपल्या देशासाठी योग्य आहे. त्याला मतदान करा. आपल्या सभोवतालच्या लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहनही शहा यांनी केले.