नवी दिल्ली । तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत असाल, तर आज तुमची प्रतीक्षा संपणार आहे. आज करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे जमा 2000 रुपये होणार आहे.
पंतप्रधान मोदी गुरुवारी पीएम-किसान योजनेंतर्गत सुमारे 8.5 कोटी शेतकरी लाभार्थ्यांना 14 वा हप्ता म्हणून सुमारे 17,000 कोटी रुपये जारी करतील. राजस्थानमधील सीकर येथे आयोजित कार्यक्रमात ही रक्कम DBT द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. यावेळी शासनाकडून भुलेख पडताळणीमुळे हप्ता देण्यास विलंब झाला आहे.
PM किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) 24 फेब्रुवारी 2019 रोजी लाँच करण्यात आली.या योजनेअंतर्गत, थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे देशभरातील शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये दिले जातात.
आतापर्यंत देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकर्यांना 2.42 लाख कोटी रुपयांहून अधिकचा लाभ देण्यात आला आहे. यापूर्वी 13 हप्त्यांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा करण्यात आले असून आज 14 हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
दरम्यान, तुम्हाला 14वा हप्ता म्हणून पैसे मिळतील की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रथम PM KISAN वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. येथे, फार्मर्स कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर, विनंती केलेले तपशील भरा. येथे मागितलेली माहिती प्रविष्ट केल्यानंतर लाभार्थी यादी उघडेल. जर तुमचे नाव या यादीत असेल तर आज तुमच्या खात्यात पैसे येतील. जर तुमचे नाव यादीत नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत.