Ladki Bhaeen Yojana : राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. डिसेंबर महिन्यापर्यंत 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात 9,000 रुपये जमा झाले आहेत. मात्र, जानेवारी महिन्याचे 15 दिवस उलटूनही हप्ता जमा झालेला नाही, त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
हेही वाचा : शिक्षकाशी फेसबुकवर मैत्री; तरुणीने घरी बोलावलं अन् अंगावरील कपडे…, अखेर ‘त्या’ प्रकरणाचा उलगडा
मार्चपासून हप्ता वाढण्याची शक्यता
महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतेच विधान केले की, मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता मिळण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होणार असून सुधारित रक्कम 2100 रुपये असेल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : 36 वर्षीय महिलेचं 15 वर्षीय मुलावर जडलं प्रेम; लग्नासाठी पळालेही, पण…
भुजबळांचा नियमबाह्य लाभांवर सवाल
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी योजनेवर प्रतिक्रिया देत, नियमबाह्य महिलांकडून दंडासह पैसे वसूल करावेत, असे विधान केले. एका घरात दोन महिलांना लाभ नाही, वाहनधारक महिलांना पात्र ठरवले जात नाही, असे स्पष्ट करत भुजबळ यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
महिलांना 2100 रुपयांच्या हप्त्यासाठी मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल का, हे पुढील अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जानेवारी हप्ता लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी लाभार्थींनी केली आहे.