त्वचेवर नैसर्गिक चमक आणायची आहे? मग करा हे उपाय

तरुण भारत लाईव्ह । २९ ऑगस्ट २०२३। आपण सुंदर दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं पण धावपळीच्या जीवनशैलीत आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घेणं जमत नाही. यामुळे त्वचा तेलकट होते. त्वचेवर अनेक मुरूम येतात त्यामुळे आपला चेहरा खराब दिसतो. पण या समस्येवर सुद्धा काही उपाय आहेत. या उपायांनी तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकतात. आणि या उपायांनी त्वचेवर चमक येईल आणि त्वचा हेल्दी दिसेल. तर काय आहे हे उपाय जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील तर तुम्ही पपई आणि संत्र्याचे फेसपॅक लावू शकता. हे फेसपॅक तयार करण्यासाठी पपई मॅश करून घ्या त्यामध्ये १ चमचा संत्र्याचा रस घालावा. हे फेसपॅक फक्त १५ मि. चेहऱ्यावर लावून थंड पाण्याने धुवावा. या फेसपॅक ने त्वचा उजळ होण्यास मदत होईल. त्वचेवरच अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होईल.

तुमचा चेहरा जर कोरडा आणि निस्तेज झाला असेल तर तुम्ही तांदळाच्या पिठात कच्चं दूध घालून हि पेस्ट चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा. आणि १० मि. कोमट पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे तुमचा चेहरा तेजस्वी दिसण्यात मदत होईल. हा उपाय आठ्वड्यातुन तीन दिवस करावा.

बेसन हे चेहऱ्यासाठी उत्तम प्रकारे काम करत. बेसनाचा वापर तुम्ही फेसवॉश म्हणून करू शकतात. याने तुमची त्वचा नेहमी उजळ राहील आणि चेहऱ्यावर पिंपल्स कमी होतील. बेसन मध्ये अर्धा चमचा हळद घालावी आणि थोडं दुध घालावं.

 

(वरील बाबी तरुण भारत लाईव्ह केवळ वाचक व प्रेक्षकांपर्यंत पोचवत आहे. तुम्हाला जर हे उपाय करायचे असतील त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)