आनंदी रहायचं आहे? फॉलो करा ‘या’ टिप्स

तरुण भारत लाईव्ह । १८ जानेवारी २०२३। आजच्या धावपळीच्या जगात, आपल्या आयुष्यात सतत काही ना काही अडचणी सुरु असतात. म्हणजे, आर्थिक, ऑफिस मध्ये किंवा घरातील भांडण अशा बऱ्याच अडचणी आपल्या लाईफ मध्ये सुरु राहतात. यामुळे काय होतं तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचं टेन्शन येऊन आपण आनंदी रहायचं विसरून जातो. अशा परिस्थितीत आपल्याला साधं मनमोकळेपणाने हसायला पण येत नाही. तुम्हाला माहित आहे का? हसणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं असत. आपल्याला हा प्रश्न नेहमीच पडत असेल की नेमकं आनंदी रहायचं कसं? या बद्दलच्या काही टिप्स तरुण भारत’च्या माध्यमातून जाणून घ्या.

तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. तुम्ही दिवसातून २० मिनिटे गाणी ऐकलीत तरी तुमचा मूड चांगला होण्यास मदत होते.

तुमच्याकडे जर पाळीव प्राणी असेल तर त्यांच्यासोबत काही वेळ घालवल्याने तुम्ही आनंदी रहाण्यास मदत होईल. त्यासोबतच तुम्ही मेडिटेशन करून मनाला शांती देऊ शकता.

तुमच्यासाठी तुम्ही दिवसातला काही वेळ काढू शकता आणि त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा छंद जोपासू शकता. किंवा नवीन रेसिपी ट्राय करू शकता.

एखाद आवडीचं पुस्तक देखील तुम्ही वाचू शकता, एकाच दिवशी पूर्ण पुस्तक वाचून मोकळे होऊ नका. रोज थोडे म्हणजेच एक किंवा दोन पाने वाचा.

दिवसातून १० मिनिटे तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणीसोबत थोडा वेळ घालवा किंवा भेटणं शक्य नसेल तर थोडावेळ फोन वर बोला तुमचं मन तुमच्या मित्रमैत्रिणींजवळ व्यक्त करा, यामुळे तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला रिलॅक्स वाटेल.

घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासोबत थोडा वेळ तुम्ही घालवू शकता, यामुळे तुमच्यात उत्साह निर्माण होईल. सोबतच तुम्ही आनंदी रहायला देखील मदत होईल.