बेस्ट बाईक खरेदी करायची आहे? मग ही बातमी वाचाच

तरुण भारत लाईव्ह ।०६ फेब्रुवारी २०२३। तुम्ही जर नवीन गाडी खरेदी करायचा विचार करत असाल आणि तुम्हाला जर १०० सीसीची कोणतीही स्वस्त आणि चांगली बाइक खरेदी करायची असेल तर हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक आणि हिरो एचएफ डिलक्स सोबत टीव्हीएस एक्सएल १०० कम्फर्ट आणि टीव्हीएस एक्सएल १०० हेवी ड्युटी सारख्या टू-व्हीलर्सची निवड करू शकता या गाडीचे फीचर्स जबरदस्त असल्यामुळे हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.

१०० सीसी सेगमेंट मध्ये हिरो स्प्लेंडर प्लस बेस्ट सेलिंग बाइक आहे. या बाइकचे मायलेज बेस्ट असून, याचे फीचर्स सुद्धा जबरदस्त आहे. स्प्लेंडर प्लसचे मायलेज ६५ किमी प्रति लीटर पर्यंत आहे. यानंतर हिरो एचएफ डिलक्स आहे. याची ऑन रोड किंमत ७१ हजार १७६ रुपये ते ८० हजार २५८ रुपये पर्यंत आहे.

टीव्हीएस एक्सएल १०० मायलेज आणि पॉवरमध्ये या दोन्ही बेस्ट आहेत. भारतीय बाजारात टीव्हीएस मोटर कंपनीने कमी किंमतीत चांगले मायलेजचे मोपेड आणली आहे. ज्यात TVS XL100 Heavy Duty ची किंमत ४७ हजार १४१ रुपये पासून सुरू होते.