तरुण भारत लाईव्ह ।०४ फेब्रुवारी २०२३। स्मार्टफोन ची गरज हि प्रत्येकालाच पडते, कोणाशी संपर्क साधायचा असेल किंवा कोणापर्यंत संदेश पाठवायचा असेल अशा बऱ्याच वेळेस स्मार्टफोन हा लागतोच. पण स्मार्टफोन ची बॅटरी लवकर संपली तर आपल्याला मोठी समस्या निर्माण होते. कधी- कधी तर बॅटरीची समस्या इतकी वाढते कि नवीन बॅटरी विकत घ्यावी लागते. या सगळ्या समस्या जर टाळायच्या असतील तर आपल्या स्मार्टफोन मध्ये या काही सेटिंग्स करून तुम्ही बॅटरीची समस्या दूर करू शकता.
स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप वाढवायचा असल्यास अनेक Apps ची मदत घेता येईल. यासाठी तुम्ही थर्ड पार्टी अप्सची मदत घेता येईल. हे काम तुम्ही थर्ड पार्टी अॅप Pix off द्वारे देखील करू शकता. तुम्हाला गुणवत्तेत फारशी घसरण दिसणार नाही. विशेषतः जेव्हा तुमच्याकडे 1080 पिक्सेल किंवा त्याहून अधिक स्क्रीन असेल
फोनचा बॅटरी बॅकअप वाढवायचा असेल तर, एक पद्धत लोकेशन सर्व्हिसेस देखील आहे, जी फोनची बॅटरी वाचविण्यात मदत करते. तुम्हाला अॅप्सच्या लोकेशन सर्व्हिसेस बंद कराव्या लागतील. येथे तुम्हाला कोणत्या अॅप्सना लोकेशन परवानगी देण्यात आली आहे ते दिसेल. आता ज्या अॅपची परवानगी तुम्हाला काढायची आहे त्यावर क्लिक करा.
अनेकदा स्मार्टफोन नवीन असतो तेव्हा स्मार्टफोनची बॅटरी देखील भरपूर चालते. तस-तशी फोनचा बॅटरी बॅकअप देखील कमी व्हायला लागतो. स्मार्टफोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज व्हायला लागली की, युजर्सना देखील टेन्शन येते. अशात फोनचा बॅटरी बॅक चांगला ठेवायचा असेल तर, ब्राईटनेस आपोआप बदलण्यासाठी सेट करा. भरपूर बॅटरी वापरणाऱ्या अॅप्सचा वापर कमी करा. अडॅप्टिव्ह बॅटरी चालू करा. डार्क थीम सुरू करा.