---Advertisement---

इंडिया आघाडी बैठकीसाठी पैशांची उधळपट्टी; ४५ हजारांची खुर्ची, ४ हजार ५०० रुपयांचे जेवणाचे ताट

---Advertisement---

मुंबई : मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये इंडिया आघाडीची ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी बैठक होत आहे. या बैठकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी या बैठकीवरुन आघाडीवर टीका केलीये. आम्ही गुवाहाटीला गेलो, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलो म्हणून टीका करण्यात आली. पण, आता मुंबईतील बैठकीसाठी कोट्यवधींचा खर्च होत आहे, त्याचं काय? असा सवाल सावंत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, इंडिया आघाडीची बैठक १४-१५ तासांचा इव्हेंट आहे. कुणी कुठे कार्यक्रम करावा हा त्यांचा प्रश्न आहे. पण मुंबईतील जुन्या खुर्च्या या लोकांना नको होत्या. म्हणून ४५ हजारांची एक खुर्ची अशा ६५ खुर्च्या नवीन घेण्यात आल्या. त्यामुळे १४ तासांसाठी एका नेत्याला बसायला ४५ हजारांची खुर्ची घेतली जाते त्यांना आमच्यावर बोलायचा अधिकार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच ज्या ६५ खोल्या बुक केल्यात त्या लॉजिंग बोर्डिंगमधील नाही तर फाईव्ह स्टारमधील आहेत. मराठमोळ्या जेवणाची व्यवस्था ताटाला ४५०० हजार रुपये. खोलीची किंमत २५-३० हजार रुपये आहे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेला पक्षातील आमदार हॉटेलला राहिले तेव्हा आमच्यावर टीका केली गेली. आता १४ तासांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.

केवळ ५ पक्ष सोडले तर ११ पक्षांचे खासदार शून्य आहेत. NDA मध्ये ३६५ खासदार आहेत. देशाच नाव मोठं करणाऱ्या नेत्याचं खच्चीकरण केल जातंय. ही लोकं मुंबईत केवळ पर्यटनासाठी आलेत. मुंबईत बैठकीला आलेल्या लोकांनी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा किंवा मोदींच पंतप्रधान होतील, हे जाहीर करावं, असं ते म्हणाले. राम मंदिर, कारसेवक, समान नागरी कायदा अशा अनेक विषयांवर जे बाळासाहेबांची मतं होती, त्यांना या लोकांनी विरोध केला होता, असं ते म्हणाले.

इंडिया आघाडीतील अनेक पक्ष असे आहेत ज्यांनी बाळासाहेबांवर टीका केली होती. कलम ३७० रद्द करावे यासाठी बाळासाहेबांनी मागणी केली. त्यावर बहुतांश नेत्यांनी टीका केली. राम मंदिर, कारसेवा याबाबतही बाळासाहेबांवर टीका केलीय. आज महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की, जी यादी हॉटेलला दिली आहे. त्यात उद्धव ठाकरे २६ नंबरवर वर शरद पवार २५ नंबरवर आहेत. महाराष्ट्रातले २ पक्ष शेवटून २-३ नंबरला असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.

स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी देशाच्या नावाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीनंतर कायमची संपेल. I.N.D.I.A अशी ही आघाडी म्हणजे I म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस संपेल, N म्हणजे त्यांच्यासोबतची NCP संपेल, D म्हणजे DMK संपेल, I म्हणजे इंडियन मुस्लीम लीग संपेल. A म्हणजे आप संपेल त्याशिवाय अन्य सगळे संपेल. देशाच्या नावाचा राजकारणासाठी उपयोग करणे याशिवाय दुसरे दुर्दैव नाही अशा शब्दात मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केली आहे.

 

 

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment