सुवर्णसंधी ! फक्त 99 रुपयांत पाहा कोणताही चित्रपट, जाणून घ्या कधी ?

चित्रपटप्रेमींसाठी ‘सिनेमा लव्हर्स डे’ने मोठी घोषणा केली आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी ‘सिनेमा लव्हर्स डे’ च्या निमित्ताने प्रेक्षकांना कोणताही चित्रपट फक्त 99 रुपयांत पाहण्याची संधी मिळणार आहे. बॉलिवूडसह देशभरातील सिनेमागृहे आणि मल्टिप्लेक्स या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा : शिक्षकाशी फेसबुकवर मैत्री; तरुणीने घरी बोलावलं अन् अंगावरील कपडे…, अखेर त्या प्रकरणाचा उलगडा

‘इमर्जन्सी’ आणि ‘आझाद’ चित्रपटांचे खास प्रदर्शन

याच दिवशी कंगना रणौतचा बहुप्रतिक्षित ‘इमर्जन्सी’ आणि राशा थडानीचा ‘आझाद’ चित्रपट प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपट 99 रुपयांत अनुभवता येतील.

हेही वाचा : दारू पाजून विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; नेता आणि गायकावर गंभीर आरोप

सिनेमागृहांतील गर्दीसाठी खास योजना

‘पुष्पा-2’, ‘फतेह’, ‘मुफ्सा- द लायन किंग’, तसेच ‘कहो ना प्यार है’, ‘ये जवानी है दीवानी’ आणि ‘सत्या’ यांसारख्या क्लासिक चित्रपटांचा आनंदही फक्त 99 रुपयांत घेता येणार आहे. प्रेक्षकांनी पुन्हा चित्रपटगृहांकडे वळावे आणि चित्रपटगृहांचा व्यवसाय तेजीत यावा, यासाठी निर्माते आणि वितरण कंपन्यांनी हा उपक्रम आखला आहे.

प्रेक्षकांसाठी सुवर्णसंधी

सिनेमा लव्हर्स डे प्रेक्षकांसाठी केवळ मनोरंजनच नाही, तर कमी किमतीत उत्कृष्ट चित्रपट पाहण्याचा उत्सवही आहे. त्यामुळे 17 जानेवारीला तुमच्या आवडत्या चित्रपटांचा आनंद घ्या आणि सिनेमागृहाचा अनुभव पुनः अनुभवण्याची संधी दवडू नका!