शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला ‘हा’ व्हिडिओ पहाच

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिन २३ डिसेंबर हा शेतकरी दिन म्हणून साजरा होतो. शेतकरी दिनानिमित्ताने उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून यास अनेकांची पसंती मिळत आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी हा व्हिडिओ शेअर करतांना त्यासोबत, देश की तस्वीर है किसान… असं कॅप्शन त्यांनी दिलंय.

शेतकरी आणि ट्रॅक्टरचा नातं हे आता बैलं आणि बळीराजाचं नातं असाव तसंच बनलं आहे. त्यामुळे, शेतकर्‍यांप्रती ट्रॅक्टरच्या माध्यमातून आदरभाव व्यक्त करण्यात आला आहे. महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्र यांनी महिंद्रा ट्रॅक्टरच्या माध्यमातून भल्यामोठ्या जागेत शेतकर्‍याची प्रतिमा सकारली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टरचे दिवे लावून हा प्रतिमा उजळल्याचंही पाहायला मिळतं.