रेल्वे रुळांवर साचले पाणी; जळगावमार्गे वळवण्यात आल्या ‘या’ रेल्वेगाड्या

भुसावळ : मध्य रेल्वेच्या वासिंद- खडवली या दरम्यान मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला आहे. अनेक गाड्या वसई व अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

दिवा, वसई रोड, जळगावमार्गे वळवण्यात आलेल्या रेल्वेगाड्या
क्र. १२५३४ मुंबई- लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस, क्र. १२५१९ एलटीटी आगरतला एक्स्प्रेस, क्र. १२३३६ लोकमान्य टिळक टर्मिनस-भागलपूर.

जळगाव-वसई रोड-दिवा मार्गे वळवण्यात आलेल्या रेल्वेगाड्या 
क्र. ११०६० छपरा-एलटीटी एक्स्प्रेस, क्र. १२२९४ प्रयागराज- एलटीटी दुरंतो एक्स्प्रेस, क्र.१२७४२ पाटना जंक्शन-वास्को-दा-गामा एक्स्प्रेस, क्र. १४३१४ बरेली जंक्शन एलटीटी एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन क्र. ११०१२ धुळे -सीएसएमटी एक्सप्रेस नाशिकरोड येथे, क्र. १११२० भुसावळ-इगतपुरी मेमू मनमाड येथे, क्र. १२१४० नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस देवळाली येथे तर क्र. १२१५२ शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस इगतपुरी येथे थांबविण्यात आल्या आहेत.

शॉर्ट ओरिजिनेटेड गाड्या अशा
क्र. १२१३९ सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकरोड येथून शॉर्ट ओरिजिनेटेड करण्यात आली आहे.
क्र. ११०११ मुंबई-धुळे एक्स्प्रेस नाशिक येथून परतीचा प्रवास करेल. नाशिक स्टेशन येथून प्रवाशांसाठी बसची सुविधा रेल्वेद्वारा करण्यात आली होती