---Advertisement---
---Advertisement---
WCL Semi-Finals 2025 : इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) २०२५ कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या लीगचे सेमीफायनल सामने ३१ जुलै रोजी खेळवले जाणार आहेत. इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स या संघांमध्ये पहिला सेमीफायनल सामना होणार आहे. मात्र, या सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
गुरुवारी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या सेमीफायनलमध्ये इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. भारतीय खेळाडूंनी त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यासोबत कोणत्याही स्पर्धात्मक सामन्यात भाग न घेण्याचे धोरण कायम ठेवले आहे. लीग स्टेज सामन्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, जेव्हा भारतीय खेळाडू आणि स्पर्धेच्या मुख्य प्रायोजकांनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास आक्षेप घेतला होता.
या लीगमध्ये ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी लीग स्टेजमध्येही इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात एक सामना खेळवण्यात येणार होता. पण भारतीय खेळाडूंनी सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्याने तो सामना रद्द करण्यात आला. पण यावेळी हा नॉकआउट सामना आहे आणि अंतिम फेरीचे तिकीट धोक्यात आहे. अशा परिस्थितीत कोणत्या संघाला अंतिम फेरीत स्थान मिळेल हा एक मोठा प्रश्न आहे.
रोमांचक सामना जिंकून उपांत्य फेरीत मिळवले स्थान
मंगळवारी झालेल्या त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात वेस्ट इंडिज चॅम्पियन्सना फक्त १३.२ षटकांत पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या हंगामातील इंडिया चॅम्पियन्सचा हा पहिलाच विजय होता, ज्यामुळे ते उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी झाले. याआधी इंडिया चॅम्पियन्सना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स आणि ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.