पाच वर्षांत मतदारसंघाचा आदर्श विकास मॉडेल निर्माण करू – आमदार अमोल पाटील

#image_title

कासोदा : पाच वर्षांच्या कालावधीत राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे मतदारसंघाचा विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून ओळख निर्माण करण्याचा संकल्प आमदार अमोल पाटील यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीत विजयानंतर तळई (ता. एरंडोल) येथे ग्रामस्थांनी त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चिमणराव पाटील होते. या प्रसंगी आमदार अमोल पाटील यांनी मतदारसंघातील सिंचन प्रकल्प, अपूर्ण विकासकामे आणि इतर महत्वाच्या योजना पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

विकासकामांच्या माध्यमातून मतदारांचे ऋण फेडणार

आमदार पाटील म्हणाले, “मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला विकासकामांच्या माध्यमातून उतराई होणार आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे हे माझे प्राथमिक उद्दिष्ट आहे. येत्या पाच वर्षांत मतदारसंघाची वेगळी ओळख निर्माण होईल.”

माजी आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघातील मागील पाच वर्षांत तीन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाल्याचे सांगितले. या कामांमध्ये सिंचन, रस्ते, जलसंपदा प्रकल्प आदींचा समावेश आहे.

कार्यक्रमाला अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.