---Advertisement---

जळगावात कडाक्याच्या थंडीचा अंदाज; पुढचे ५ दिवस कसे राहणार वातावरण? वाचा

---Advertisement---

जळगाव । राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार होताना दिसत असून अशातच आता जळगावसह महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होत आहेत. गेल्या आठवड्यात १८ अंशावर गेलेला जळगावचा पारा १३ अंशापर्यंत घसरला असल्याने रात्री आणि पहाटच्या थंडीत वाढ झाली. २३ जानेवारीनंतर जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आहे.

नवीन वर्षाची सुरुवात झाल्यापासून हवामान हे संमिश्र राहिले आहे. काही दिवस कडाक्याची थंडी तर काही दिवस ढगाळ वातावरण व त्यामुळे गायब झालेली थंडी असे वातावरण जानेवारी महिन्यात आतापर्यंत पाहायला मिळाले होते. आता आगामी दोन ढगाळ वातावरण कायम राहू शकते. मात्र, २३ जानेवारीनंतर जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीचा अंदाज आहे.

गेल्या आठवड्यात जळगावचे वातावरण १८ अंशापर्यंत वाढले होते. मात्र शुक्रवारपासून त्यात घसरण होताना दिसून आले. रविवारी जळगावचे किमान तापमान १३ अंशापर्यंत तर कमाल तापमान ३०.४ अंश इतके होते. दरम्यान आज जळगावचे किमान तापमान १२ अंशापर्यत राहण्याची शक्यता असून यादरम्यान वाऱ्याचा वेग तशी १५ ते २० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत राहू शकतो थंडीचा जोर..
यंदा जिल्ह्यात थंडीचे आगमन जरा उशिरानेच झाले होते. त्यातही नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातही अनेक दिवस ढगाळ वातावरण राहिल्याने यंदा तसा थंडीचा कडाका जाणवलेलाच नाही.फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा अवकाळीची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. तर फेब्रुवारी अखेरपर्यंत मात्र थंडीचा जोर राहण्याचा अंदाज आहे.

आगामी पाच दिवस कसे राहणार वातावरण
२० जानेवारी : तापमान १२ अंश, कोरडे वातावरण राहणार
२१ जानेवारी : तापमान १४ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण राहणार
२२ जानेवारी : तापमान १४ अंश, सकाळच्या वेळेस धुकं, दुपारनंतर काही अंशी ढगाळ वातावरण राहणार
२३ जानेवारी : तापमान १६ अंश, दुपारनंतर काही अंशी ढगाळ वातावरण राहणार
२४ जानेवारी : तापमान १३ अंश, कोरडे वातावरण राहणार

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment