तरुण भारत लाईव्ह । २६ ऑगस्ट २०२३। विकेंडला चमचमीत काहीतरी खावंसं वाटतं. मग अशावेळी काय वेगळं करावं हा प्रश्न अनेकांना पडतो. तर अशावेळी तुम्ही पोहे पकोडे हा स्वादिष्ट आणि रुचकर असा पदार्थ घरी बनवू शकता. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या. तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
पोहे, बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, लाल तिखट, साखर, लिंबू, तेल
कृती
सर्वप्रथम, पोहे नीट धुवून घ्या. त्यानंतर पोहे १० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर एक खोल तळ असलेले भांडे घ्या आणि त्यात उकळलेले मॅश केलेले बटाटे आणि भिजवलेले पोहे घाला आणि दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा. यानंतर पोहे आणि बटाट्याच्या मिश्रणात हिरवे धणे, हिरवी मिरची, जिरे, लाल तिखट, साखर, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून सर्व काही परत एकदा चांगले मिसळा.
यानंतर आता एका कढईत तेल टाका आणि मध्यम आचेवर गरम करा, तयार मिश्रण हातात घेऊन पकोडे बनवा आणि पकोडे दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. तुमचे क्रिस्पी पोहे पकोडे तयार झालेत. पोहे पकोडे सॉससोबत सर्व्ह करा.