साप्ताहिक राशिभविष्य; जाणून घ्या तुमची राशी काय म्हणते?

तरुण भारत लाईव्ह ।१२ फेब्रुवारी २०२३।

मेष रास 
आठवड्याच्या सुरवातीला लाभलेले ग्रहयोग पाहता आपली आर्थिक घडी विस्कटणार नसली तरी आपणास बरेच मनस्वी वागण्याची तऱ्हा हे ग्रहमान देऊ शकते. यामुळे आपला वेळ आणि पैसे अनाठायी खर्च होऊ शकता. काहींना खाण्या-पिण्याच्या सवयींवर बंधने घालण्याची गरज आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः छातीचे व हृदयाशी संबंधित त्रास असलेल्यांनी तर काळजी घेतलीच पाहिजे. कुटुंबाकडे लक्ष द्यावे लागेल.

वृषभ रास 
या आठवड्यातील ग्रहमान पाहता ते आपल्याला धनलाभासाठी निश्चितच उत्तम असले तरी ते आरोग्यासाठी मात्र फारसे पोषक नाही. काहींच्या प्रकुतीला त्रास निर्माण करू शकतात. जुन्या रुग्णांनी दीर्घ  काळापासून आरोग्यविषयक काही त्रास असलेल्यांनी मात्र काळजी घेतली पाहिजे. आठवड्याच्या मध्यानंतर एखाद्या जुन्या त्रासाला अकल्पित वळण मिळून आरोग्य अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावध रहावे.

मिथुन रास
हा आठवडा आपणास शारीरिक व मानसिकदृष्ट्या काहीसा त्रासदायक ठरू शकतो. आपल्या राशिस्वामी बुधाची भूमिका सद्या नकारात्मक आहे. त्यामुळे सावध असावे. काहींना त्वचेशी संबंधित त्रास या आठवड्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामानातील बदल सुद्धा त्रासदायक ठरू शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात काही लोकांना प्रवास योग संभवतात. काही युवक – युवतींना विवाहाचे योग्य लाभू शकतील.

कर्क रास
या आठवड्याच्या सुरवातीला लाभलेले ग्रहमान पाहता अगोदर केलेल्या काही चांगल्या कामाचे फळ आता मिळणार आहेत. यामुळे सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. अचानक एखादा मोठा आर्थिक लाभ मिळू शकेल. नोकरी व्यवसायात उत्तम संधी लाभतील. काहींना लांबचे प्रवास होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.या आठवड्यात तुमचे आरोग्य पण उत्तम राहील.

सिंह रास 
प्राप्त ग्रहमान पाहता आपली आर्थिक बाजू या आठवड्यात समाधानकारक राहू शकेल. मात्र काहींना त्यातही बरेच चढउतार पाहावे लागू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने फारसे शुभदायक योग नाहीत. व्यवसायिकांना बाजारातील मंदीचे वातावरण चिंता निर्माण करणारे ठरू शकते. नोकरदार वर्गाला कोणताही आर्थिक फटका बसणार नसला तरी कार्यालयीन व्यवस्थेतील बदल अस्वस्थ करणारा ठरू शकतो.

कन्या रास 
या आठवड्याच्या सुरवातीला लाभलेले ग्रहमान पाहता आपल्या बुद्धीचा पुरेपूर वापर करून यशाचे दान पदरात पाडून घेण्यास उपयुक्त असा हा काळ आहे. व्यवसायिक क्षेत्रातील मंडळींना या ग्रहमानाची शुभ फळे दिर्धकाळ मिळत रहातील. व्यवसायिक स्पर्धेत यश मिळेल. काहींना या काळात नोकरीच्या संधी लाभुन त्यात आपली चुणूक दाखवता येईल. वाहन, घर व अन्य मालमत्तेच्या खरेदीकडे कुटुंबाचा कल राहील.

तुळ रास 
या आठवड्यातील ग्रहमान पाहता आपले व्यवसाय -क्षेत्र व आर्थिक स्थाने सक्रिय झालेली दिसत आहेत. त्यामुळे आपल्याला नोकरी व्यवसायात उत्तम योग आहेत. या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील. नवे व्यवसायिक करार व्यवसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. नवीन ओळखी, नवे संबधं प्रस्थापित होऊ शकतील. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील.

वृश्चिक रास
या आठवड्याच्या सुरवातीला लाभलेले ग्रहमान पाहता शिक्षण आणि कलागुणांच्या दृष्टींनी आपल्याला चांगले योग संभवतात. कला साहित्य संगीत क्षेत्रातील व्यक्तींना शुभ योग लाभण्याची शक्यता आहे. शैक्षणिक प्रगती, कलागुणांचा विकास त्या त्या क्षेत्रातील कौशल्य त्यातून अर्थलाभ यासाठी हा काळ उत्तम ठरावा. कलाकारांना कौतुक, मान सन्मानाचा लाभ होऊ शकतो. 

धनु रास
या आठवड्याच्या सुरवातीला लाभलेले ग्रहमान आपल्या साथीदाराचा उत्कर्ष होण्याचे सुचवीत आहे. जोडीदाराची प्रगती, उत्कर्ष घडविणाऱ्या काही घटना घडू शकता.उधारी वसूल होऊन आर्थिक स्थिती मजबुती होऊ शकते. आपल्या व आपल्या जोडीदाराच्या आर्थिक स्थितीत सुधार घडून येण्याची हि नांदी ठरू शकते. खर्चाला काही नवीन वाटा सापडू शकतात. परंतु हा खर्च निरर्थक जाणार नाही. काही सार्थक कामे संभवतात.

मकर रास 
या आठवड्याच्या सुरवातीला लाभलेली ग्रहस्थिती पाहता या काळात आपणास काही चमत्कारिक अनुभव येतील. काही कामे आपल्या अपेक्षेपेक्षा कमी काळात पूर्णत्वास जाऊ शकतात. व्यवसायिक स्पर्धेत यश मिळेल. या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम राहील. कुटुंबात मुलांच्या संदर्भात काही चांगल्या घटना घडतील. काही लोकांना प्रवास योग संभवतात.

कुंभ रास 
या आठवड्यातील ग्रहमान पाहता आपले सारे गणित नेहमी बरोबरच येईल असे होऊ शकणार नाही. अनेकदा आपण द्विधा मनस्थितीत राहून हातच्या संधी घालवण्याची शक्यता राहू शकते, त्यामुळे कोणताही निर्णय घेताना साऱ्या स्थितीचा पुरेपूर विचार करणे आवश्यक आहे. कोणाचेही मन दुखावेल असे वर्तन आपल्या हातून घडू नये आणि मनाला लागेल असे कुणाला बोलले जाऊ नये याची काळजी घ्या.

मीन रास 
या आठवड्याच्या सुरवातीला लाभलेले ग्रहमान पाहता आपली जणू संपूर्ण कुंडलीच सुखाने सजली आहे असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. या आठवड्यत जमलेले ग्रहांचे समीकरण अतिशय उत्तम लाभ देणारे आहे. आपला आणि जोडीदाराचा उत्कर्ष घडविणारा हा योग आहे. आर्थिक, कौटुंबिक, मानसिक, सामाजिक स्तरावर याचे अतिशय शुभ प्रभाव आपणास अनुभवायला मिळणार आहे.