world record : जगात विक्रम करण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले आहेत. मात्र, यात मोजकेच लोकं यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर काही पुन्हा प्रयत्न करत करताना दिसत आहेत. मात्र, एका व्यक्तीने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नावाची नोंद करण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्डच्या नादात ७ दिवस सतत रडून दृष्टी गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नायजेरियन टेम्बू एबेरे हा व्यक्ती वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी सात दिवस रडला. सर्वात अवघड टास्क या पठ्ठ्याने केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंद होईल, या दृष्टीकोनातून टेम्बू एबेरे इतका रडला की, त्याने काही वेळासाठी डोळ्यांची दृष्टीच गमावली.
वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या प्रयत्नात ७ दिवस सातत्याने रडत होता. सतत रडल्याने त्याची ४५ मिनिटांसाठी डोळ्यांची दृष्टीही गेली होती. रडून रडून त्याचा चेहरा सुजला. तसेच काही काळ त्याला डोकेदुखी जाणवत होती. तसेच डोळ्याच्या दृष्टीचाही त्याला त्रास झाला. मात्र, इतकं करूनही त्याचं नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले नाही.
दरम्यान, या नायजेरिन व्यक्तीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज केलेला नव्हता. त्यामुळे त्याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होणार नाही. नायजेरिन एबेरे म्हणाला की, मला दुसऱ्यांदा रणनीती बनवावी लागली. सात दिवस रडण्यासाठी खूप मेहनत केली. मात्र, काही दिवसांनी माघार घ्यावी लागली. ‘मी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे त्याची नोंद होणार नाही. अनेक नायजेरिन व्यक्तींनी या आधी अधिक काळ रडून रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे,असाही तो म्हणाला.