---Advertisement---

कुख्यात गोल्या त्याचा साथीदारासह जेरबंद, तीन लाखांच्या दुचाकी जप्त

---Advertisement---

---Advertisement---

धुळे : पश्चिम देवपूर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ३ लाख २० हजार रुपये किमतीच्या १० मोटारसायकली जप्त करीत मोटरसायकल दाखल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. ४ अटकेतील दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. यातील अट्टल चोरटा गोल्या उर्फ आदिनाथ युवराज बोरसे याच्याविरुद्ध २५ गुन्हे दाखल आहेत.

पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कापडणीस यांना गोपनीय माहिती मिळाली की, पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील चोरीला गेलेली मोटारसायकल वसमार गावात आहे. पथकाने वसमार गावात छापा टाकून पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार गोल्या उर्फ आदिनाथ युवराज बोरसे (वय २४, रा. वाडीभोकर रोड) याला गुन्ह्यातील मोटारसायकलसह ताब्यात घेतले. पोलिसांनी गोल्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपला साथीदार भरत सदा अहिरे (वय ३८, रा. वसमार, ता. साक्री) याच्या मदतीने १० मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

---Advertisement---

गोल्या विरोधात धुळ्यासह गुजरातमध्ये २५ गुन्हे दाखल

गुन्ह्यातील प्रमुख संशयित आरोपी गोल्या उर्फ आदिनाथ युवराज बोरसे याच्याविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाणे, धुळे, देवपूर पोलिस ठाणे आणि गुजरात राज्यात असे एकूण २५ गुन्हे दाखल आहेत. गोल्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी भरत अहिरे यालाही ताब्यात घेतले. दोन्ही संशयितांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी चोरलेल्या एकूण ३ लाख २० हजार रुपये किमतीच्या १० मोटारसायकली त्यांनी काढून दिल्या. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

यांच्या पथकाने केली कारवाई

दुचाकी उघड केल्याची कारवाई सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, उपनिरीक्षक साईनाथ तळेकर, असई. जितेंद्र आखाडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल मनोज साठे, मनोहर पिंपळे, दीपक गायकवाड, प्रमोद चौधरी, पुरुषोत्तम सोनवणे, पोकॉ. किरणकुमार सावळे, अतुल जाधव, हेमंत पवार, सुनील राठोड, सनी सरदार, किरण भदाणे आदींनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment