---Advertisement---
जळगाव : आज, मंगळवारी सोन्याच्या किमतीत बदल दिसून येत आहे. देशात २४ कॅरेट सोने ९९,८९० रुपये प्रति १० ग्रॅम दराने व्यवहार करत असून, त्यात १९० रुपयांनी वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोने ९१,५६० रुपयांवर, तर १८ कॅरेट सोने ७४,९२० रुपये प्रति १० ग्रॅम दराने व्यवहार करत आहे.
जळगावात चांदीने रचला इतिहास
जळगाव सुवर्णपेठेत २२ कॅरेट सोने दर प्रति तोळा ९०,४७८ रुपये, तर २४ कॅरेट सोने दर ९८,७०० रुपये (जीएसटीसह १०१६६१) प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. दरम्यान, चांदी दर प्रति किलो १,१४,००० (जीएसटीसह ११७४२०) रुपयांवर पोहोचला आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,००,०४० रुपये दराने व्यवहार करत आहे. २२ कॅरेट सोने ९१,७१० रुपये आणि १८ कॅरेट सोने ७५,०४० रुपये दराने व्यवहार करत आहे.
आर्थिक राजधानी मुंबई तसेच चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोने ९९,८९० रुपयांवर व्यवहार करत आहे. तर मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोने ९१,५६० रुपयांवर विकले जात आहे. मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये १८ कॅरेट सोन्याची किंमत ७४,९२० रुपये आहे, तर चेन्नईमध्ये ते ७५,४१० रुपयांवर विकले जात आहे.
अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोने ९९,९४० रुपयांना विकले जात आहे, तर २२ कॅरेट सोने ९१,६१० रुपयांना आणि १८ कॅरेट सोने ७४,९६० रुपयांना विकले जात आहे.