महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल ९१ .८८ टक्के लागला आहे. तसेच विभागीय मंडळातून कोकण विभागाने बाजी मारली तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे.
दरम्यान,बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने यंदा बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली आहे. तिला परीक्षेत ८५.११ टक्के मिळाले आहेत. निकाल जाहीर होण्याआधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी ही भावुक झाली. निकालाआधी भावुक झालेल्या वैभवीने म्हटलं की, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला आज माझे वडील नाहीयेत. माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगला लागेल. वैभवीनं निकालाआधी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतंल. यानंतर तिने निकाल पाहिला.