तरुण भारत लाईव्ह। १३ मे २०२३। कर्नाटक निवडणुकीचा निकाल दि. १३ मे रोजी लागणार आहे. त्यानुसार कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेली पाहायला मिळाली आहे. त्यावरून खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘या कलानुसार भाजपाचा कर्नाटकचा निकाल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना पूर्णपणे झिडकारून लावलं आहे. हा त्यांचा पराभव आहे. ही लोक भावना आहे. ही देशाच्या मन की बात त्यातून बाहरे पडत आहे,असे संजय राऊत म्हणाले.
कर्नाटकाच्या निकालावर काय म्हणले संजय राऊत; वाचा सविस्तर
by Mugdha Bhure
Published On: मे 13, 2023 1:23 pm

---Advertisement---
दरम्यान काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. बहुमत न मिळाल्यास सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे.कर्नाटक विधानसभेचे कल हाती येत आहेत. त्यानुसार काँग्रेस ११४ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ७३ जागावर पुढे आहे. तर जेडीएसने ३० जागावर आघाडी घेतली आहे.