जर तुम्ही रस्त्यावर असाल तर?
पटकन मोकळ्या जागेत जा, घाई-गडबड, दंगा करु नका, उंच, जुन्या आणि सलग असणाऱ्या इमारतीपासून, भिंती, विजेच्या तागंपासून लांब थांबा.
भूकंपादरम्यान काय करावे?
जमिनीवर पडा, मजबूत टेबलाखाली आसरा घ्या. जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरुन ठेवा. जर जवळपास टेबल नसेल तर जमिनीवर झोपा, पाय पार्श्वभागावर घ्या, डोके गुडघ्याजवळ घ्या, डोक्याच्या बाजू कोपरांनी झाकून घ्या आणि हात माने भोवती घ्या.
तुम्ही एखाद्या जागेच्या आतमध्ये धक्के बसणे बंद होईपर्यंत आतच राहा.
भूकंपाचा धक्क्यावेळी बेडरुममध्ये असाल तर उशीच्या सहाय्याने डोके वाचवा.
भूकंपानंतर काय करावे ?
रेडिओ / टि.व्ही. वरुन मिळणाऱ्या आपत्तीविषयक सूचनांचे पालन करा., अफवांवर विश्वास ठेवू नका व पसरवू नका, जुन्या इमारती, नुकसान झालेल्या इमारतीजवळ जाऊ नका व विजेच्या तारा, दगडी भिंतीपासून दूर रहा., पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरु असल्यास बंद ठेवा., बांधकाम तज्ञांकडून इमारतीची तपासणी करुन ती किती कमजोर झाली याची माहिती घ्या., जर काही व्यक्ती जमिनीची गाडल्या गेले असतील तर घटनास्थळी थांबा व त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करा., शोध व बचाव यंत्रणेस तात्काळ कळवा.