तरुण भारत लाईव्ह ।०३ फेब्रुवारी २०२३। वर्ष २०२३ च्या दुसऱ्या महिन्यात चार मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. या महिन्यात सूर्य, शुक्र, बुध आणि नेपच्यून आपली राशी बदलणार आहेत. राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींच्या टॅरो कार्डवर देखील होणार आहेत. टॅरो कार्डद्वारे फेब्रुवारी महिन्याची स्थिती कशी असेल हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
मेष राशीसाठी टॅरो कार्ड सूचित करते की, फेब्रुवारी महिना तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन आणेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून त्रास होऊ शकतो. तुम्ही वादविवाद टाळायला हवा. परदेशात काम करणाऱ्यांना उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. नशीब साथ देईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात, कुटुंबातील सदस्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. लांबचा प्रवास संभवतो. व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीचे नकारात्मक परिणाम होतील. यश मिळविण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील.
मिथुन रास
मिथुन राशीला लाभ मिळण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात व्यवसायात नवीन सुरुवात करावी लागेल. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे पया काळात आरोग्य चांगले राहील, कामाच्या ठिकाणी वेळ प्रतिकूल असू शकतो. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. नोकरीत सहकाऱ्यांशी वाद संभवतो.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनी या महिन्यात कोणालाही पैसे उधार देणे टाळावे, कोणत्याही गोष्टीमध्ये पैसे खर्च करण्यापूर्वी, विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. सकारात्मक विचार ठेवल्यास किरकोळ समस्या दूर होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मालमत्तेत खरेदी-विक्रीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
सिंह रास
प्रेम जीवनाच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे. विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाणार आहे. तुमच्या प्रेम जीवनाबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगा. तुमचा अहंकार मारून टाका तसेच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कामासाठी लांबचा प्रवास देखील करावा लागू शकतो.
कन्या रास
हा फेब्रुवारी महिना फारसा अनुकूल नाही. कुटुंबातील सदस्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. या महिन्यात विनाकारण कोणत्याही वादात पडू नका. फेब्रुवारी महिन्यात कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात, परंतु तुमच्या बोलण्याच्या कौशल्याच्या मदतीने तुम्ही ते सोडवू शकाल.
तूळ रास
या फेब्रुवारी महिन्यात तुम्ही तुमचे नवीन घर बांधू शकता. भाग्य उंचावेल, तुमच्या कामाचे कौतुक होईल. फेब्रुवारी महिन्यात तूळ राशीच्या लोकांच्या मानसन्मानात वाढ होईल. आरोग्य चांगले राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. पाहुण्यांचे आगमन होईल.
वृश्चिक रास
या फेब्रुवारी महिन्यात जुन्या मित्रासोबत अचानक भेट होऊ शकते. विवाहयोग्य तरुण-तरुणींच्या मनोकामना पूर्ण होतील. वृश्चिक राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यात अपत्यांमुळे अडचणी येऊ शकतात. नोकरीत सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. शत्रूंपासून सावध रहावे लागेल.
धनु रास
फेब्रुवारी महिन्यात धनु राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. विद्यार्थ्यांसाठी वेळ प्रतिकूल राहील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून या महिन्यात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, अनावश्यक कायदेशीर भांडणात अडकणे टाळा. पेपरवर्क करताना पेपर काळजीपूर्वक वाचा.
मकर रास
मकर राशीच्या लोकांनी फेब्रुवारी महिन्यात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. फेब्रुवारी महिन्यात शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे, यश मिळविण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील. कुटुंबात शांतता राहील. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
कुंभ रास
कुंभ राशीसाठी फेब्रुवारी हा आनंदाचा महिना असेल. तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील आणि जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांनाही नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कामांवर लक्ष केंद्रित कराल. कार्यक्षेत्रातही प्रगती होईल. जोडीदारासोबत प्रवासाचीही शक्यता आहे.
मीन रास
या फेब्रुवारी महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. लोकांवर विश्वास ठेवणे टाळा. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. तुमचे टॅरो कार्ड तुम्हाला या महिन्यात तुमचे खर्च नियंत्रणात ठेवण्यास सांगत आहेत. तसेच जे काम कराल ते नियोजन करून करा. जोडीदारासोबत छान वेळ घालवाल.