तरुण भारत लाईव्ह । १८ एप्रिल २०२३। गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल वेळेआधीच लागण्याची शक्यता आहे. परीक्षेचे निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत साईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर प्रसिद्ध केले जातील. या अधिकृत वेबसाईट वर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र यांसारखे तपशील नोंद करावे लागतील.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत पार पडली तर दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या दरम्यान पार पडली. बारावीच्या परीक्षेला राज्यातून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांची नोंदणी तर १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे तर दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो. तसेच बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे तसेच मॉडरेशन चे काम काम अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माहिती दिली सीबीएसईने अधिकृत वेबसाइटवर निकालाची तारीख आणि वेळ सध्या जाहीर केलेली नाही.