मातोश्रीत उद्धव ठाकरेंसोबत असणारे खरे शिवसैनिक नाहीत!

मुंबई: भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला तुम्ही जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर देताना, शिंदेनी बोलवलं तर तिकडे जाईल उद्धव ठाकरेंनी आमंत्रण दिले तर मी दसरा मेळाव्याला जाईल, असे नारायण राणे म्हणाले. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत त्यांनी शिंदे गटात सहभागी व्हावे कारण ज्या मातोश्रीत उद्धव ठाकरे राहतात त्यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

यंदाच्या वर्षीच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय भाषण करणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी येथे होत आहे. दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याचे टीझरही लॉन्च करण्यात आले आहे. तर दुरसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बॅनर लावत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळाव्याच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

अशावेळी नारायण राणे यांना दसरा मेळाव्याला जाणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मिश्किलपणे शिंदेनी आमंत्रण दिले तर जाईल उद्धव ठाकरेंनी मला आमंत्रण दिले तर मी दसरा मेळाव्याला जाईल, असे विधान केले. मात्र लगेचच ते मला आमंत्रण देणार नाहीत, असे वक्तव्य राणे यांनी केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत त्यांनी शिंदे गटात सहभागी व्हावे कारण ज्या मातोश्रीत उद्धव ठाकरे राहतात त्यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

अडीच वर्षे राज्याला ज्यांनी राज्याला १० वर्षे मागे नेले त्यांचे नाव घ्यायचे नाही आणि जे पक्ष त्यांना पाठींबा देत आहेत त्यांची अवस्था महाराष्ट्रात आणि देशात सध्या काय आहे. मग ते काँग्रेस असो वा राष्ट्रवादी असो, स्वतःची अवस्था बघावी आणि मग पाठिंबा द्यावा असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. त्यांच्याकडे उमेदवार राहिलेले नाहीत. सर्व शिंदे गटात गेले आहेत. आता भावनेचा विचार करून निवडणूक लढत आहेत, अशा शब्दांत त्यांनी अंधेरीतील पोटनिवडणूकीवरुनही निशाणा साधला. ते म्हणाले, जनता भावनेवर मतदान करणार नाही. तर विकासावर मतदान होईल. निवडणुकी आधी चिन्हाचा निर्णय होईल, असेही ते म्हणाले. तर देशद्रोही यांच्यावर कारवाई होत राहील, आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी पुरावा दाखवला आहे, असेही ते म्हणाले.