नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे-सीव्होटर मूड ऑफ द नेशनतर्फे एक सर्व्हे करण्यात आला. 15 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आलेलं की, त्यांच्या मते देशाचा सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण? या सर्व्हेक्षणात एकूण 134,487 लोकांनी सहभाग घेतला आणि त्यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री निवडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या भारताचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून स्पष्ट झालं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दुसरं स्थान मिळालं आहे. या महिन्यात जाहीर झालेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं की, 19 टक्के लोक केजरीवाल यांना लोकप्रिय मुख्यमंत्री मानतात. देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आहेत. त्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पाचव्या क्रमांकासह सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत सहभागी झाले आहेत.
देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ : 43 टक्के
अरविंद केजरीवाल : 19 टक्के
ममता बनर्जी : 8.8 टक्के
एमके स्टालिन : 5.6 टक्के
नवीन पटनायक : 3 टक्के