युजवेंद्र चहल सोबतची ती मिस्ट्री गर्ल ‘या’बाबतीत धनश्रीला देते मात

Yuzvendra Chahal :  युजवेंद्र चहलच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींच्या चर्चेने सध्या एक नवा वळण घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या आणि पत्नी धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. त्यातच चहल एका हॉटेलबाहेर एका मिस्ट्री गर्लसोबत दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे. तसेच ती मिस्ट्री गर्ल कोण ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं. तसेच त्यांच्या एकत्र फोटो आणि लग्नाचे फोटो काढले. यावरून या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. त्यातच चहल एका हॉटेलबाहेर एका मिस्ट्री गर्लसोबत दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे. तसेच ती मिस्ट्री गर्ल कोण ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण ?  

चहलसोबत हॉटेलबाहेर दिसलेली मिस्ट्री गर्ल ही लोकप्रिय रेडिओ जॉकी असून, तिच्या इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. या मिस्ट्री गर्लचं नाव आहे महविश. महविश आणि चहल यांचे मैत्रीचे नाते असल्याचे सांगण्यात येत आहे.

महविशने इंस्टाग्रामवर आपले सुंदर फोटो शेअर केले आहेत आणि ती एक अभिनेत्रीही आहे, ज्यामुळे तिचा ग्लॅमर आणि स्टाईल चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

महविश सौंदर्यात धनश्रीला कडक टक्कर देते. महविश सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते, जिथे तिने तिचे अनेक सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा स्टाईल आणि ग्लॅमर पाहण्यासारखा आहे.

इंस्टाग्रामवर तिला १.४ दशलक्ष लोकांनी फॉलो केलं आहे. एक प्रसिद्ध रेडिओ जॉकी असण्यासोबतच, महविश एक अभिनेत्री देखील आहे. महविश लवकरच एका शोमध्ये दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे.