Buldhana Bus Accident : कोण? जबाबदार २५ जणांच्या मृत्यूला

Buldhana Bus Accident आपल्याकडे घटना घडतात, निष्पाप लोकांचा प्राण जातो, देशभर समाजमन हळहळ व्यक्त करते, घटनेची चर्चा केली जाते, चौकशीची मागणी होते आणि काही काळ जाताच अशी घटना विस्मरणातही जाते.

 

जोपर्यंत नवीन घटना घडत नाही, तोपर्यंत सगळे काही सुरळीत सुरू राहते. Buldhana Bus Accident एखादी घटना घडल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देण्यात आपण सगळेच आघाडीवर असतो. घटनेबाबत साधकबाधक चर्चाही करतो. चर्चेतून जे काही निष्पन्न होते, त्यावरही चर्वितचर्वण होते. पण, कालांतराने घडलेल्या घटनेचा विसर पडल्याने नवी घटना घडल्यानंतरच आपल्याला जाग येते. हे कुठेतरी थांबले पाहिजे. केवळ चर्चा करून वा दु:ख व्यक्त करून आपली जबाबदारी थांबत नाही. Buldhana Bus Accident घडलेल्या घटनेला आपण प्रत्यक्ष जबाबदार नसलो तरी अप्रत्यक्ष जबाबदारी ही आपलीच असते, हे विसरून चालायचे नाही. हे सगळे याठिकाणी आज लिहिण्याचे कारण? आहे.

 

गेल्या शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून २२ मिनिटांनी समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजाजवळ एका खाजगी प्रवासी बसला आग लागली. त्यात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. Buldhana Bus Accident ही घटना मन हेलावून टाकणारी होती. राजकीय घडामोडींच्या वर्दळीत या घटनेवर भाष्य करायचे राहून गेले होते. अतिशय दुर्दैवी घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की, त्यात मरण पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या त्यांच्या गावी पोहोचवून तिथे अन्त्यसंस्कार करता येणे हे अवघड होऊन बसले होते. त्यामुळे हजारो नागरिक आणि शोकाकूल नातेवाईकांच्या उपस्थितीत बुलडाणा येथेच २४ मृतदेहांवर सामूहिक अन्त्यसंस्कार करावा लागला. समृद्धी महामार्गावर अपघात झाला नाही, असा एकही दिवस उजाडत नाही. Buldhana Bus Accident कुठून तरी दुर्दैवी वार्ता कानी पडतेच. सर्वाधिक अपघात हे बुलडाणा जिल्ह्यातच झाल्याचे आढळून आले आहे. सध्या जो ६०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग सुरू झाला आहे, त्याचा मध्य बुलडाणा जिल्ह्यात येतो आणि नागपूर वा नाशिककडून या मार्गावर आल्यास बुलडाणा जिल्ह्यापर्यंत ३०० किलोमीटरचे अंतर पूर्ण होते. Buldhana Bus Accident हे अंतर पार करताना वाहनाचा चालक विश्रांतीसाठी कुठेही थांबत नाही.

 

वाहन १००-१२० किमीच्या वेगाने चालवितो आणि त्यामुळे अनेकदा वाहनावरील त्याचे नियंत्रण सुटून अपघात घडतो, असे जे सांगितले जाते, ते खरे मानले तरी तेवढे एकच कारण अपघात घडण्यामागे असते, यावर विश्वास ठेवता येत नाही. Buldhana Bus Accident सरकारने हा महामार्ग नागरिकांच्या सोईसाठी तयार केला आहे. या महामार्गावर वाहन चालविताना ज्या नियमांचे पालन करायला पाहिजे, ते वाहनचालकांकडून केले जात नाही. ट्रक-बस या मोठ्या वाहनांसाठी ८० किलोमीटर ताशी वेगमर्यादा ठरवून देण्यात आली आहे आणि कारसाठी ही वेगमर्यादा १२० किमी प्रतितास एवढी आहे. Buldhana Bus Accident असे असतानाही चालकांकडून वेगाने वाहने दामटली जातात. अनेक चालक तर दीडशेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवितात. शिवाय, दोन वाहनांमध्ये किमान २०० मीटर अंतर असले पाहिजे हाही एक नियम आहे. लेन बदलण्यासाठीही नियम आहे. पण, हे नियम पायदळी तुडवून वाहने चालविली जातात, याला बेदरकारपणा नाही म्हणायचे तर काय म्हणायचे आणि हा बेदरकारपणाही अपघात घडण्यास कारणीभूत ठरतो, हे सत्य आहे. Buldhana Bus Accident जी वाहने या मार्गावर धावतात, त्यांच्यापैकी कित्येक वाहनांचे टायर्स जुने झालेले असतात.

 

अनेक वाहनांची देखभाल (सर्व्हिसिंग) नीट झालेली नसते. त्यामुळेही अपघात घडतात. पण, अशा वाहनांवर कारवाई केली जात नसल्याने ती बेदरकारपणे रस्त्यांवरून धावत असतात आणि स्वत:सोबतच इतरांनाही धोका निर्माण करीत असतात. वाहतूक पोलिस आणि आरटीओ यांनी अशा वाहनांवर, ती चालविणा-यांवर कायद्यातील तरतुदींनुसार कठोर कारवाई करणे अपेक्षित असते. Buldhana Bus Accident पण, चिरीमिरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने कुणालाही कारवाईचा धाक राहिलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. काहीही झाले आणि कुणाचाही फोन आला तरी नियम मोडणा-या वाहनावर आणि त्याच्या चालकावर दंडात्मक कारवाई व्हायलाच पाहिजे. पण, आपल्याकडे राजकीय हस्तक्षेपही मोठ्या प्रमाणात होतो. साहेबांसाठी आणि नेत्यांसाठी ‘निधी’ही गोळा करायचा असतो, त्यासाठी ‘टार्गेट’ मिळालेले असते आणि तेही पूर्ण करायचे असते. यातून मग लाचखोरी वाढते आणि कारवाईचे प्रमाण अत्यल्प ठरते. Buldhana Bus Accident हीच परिस्थिती रस्त्यांवरील बेशिस्तीला प्रोत्साहन देते. महात्मा गांधींचे दर्शन घडविले की कोणतीही कारवाई होत नाही, या दृढ समजामुळे कुणीही कायद्याला, पोलिसांना वा आरटीओला घाबरत नाही, हेही वास्तव आहे.

 

तसे पाहिले तर महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीचा एकाधिकार हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीकडे आहे. नियमानुसार इतर कुणालाही अधिकृत प्रवासी वाहतूक करता येत नाही, अशी आमची माहिती आहे. असे जर आहे तर खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक का केली जाते, या प्रश्नाचे उत्तरच मुळात चिरीमिरीमध्ये दडले आहे. Buldhana Bus Accident एका गावाहून दुस-या गावी प्रवाशांची ने-आण करण्याचा एकाधिकार हा एसटीला असताना खाजगी बसेसचा सुळसुळाट हा झालाच कसा, हा कळीचा प्रश्न आहे. या खाजगी बसेसमुळे एसटी महामंडळही तोट्यात चालते, त्यांच्या बसेसची अवस्थाही वाईट झालेली असते, कर्मचाèयांचे पगार अनेकदा वेळेवर होत नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचा-यांनी आत्महत्याही केल्या आहेत. या सगळ्या गंभीर बाबी आहेत. यावर कुणी कधी गंभीरपणे विचार करून कृती करणार आहे की नाही? Buldhana Bus Accident ज्यांनी अपघातात आपल्या जवळचं कुणी गमावलं आहे, त्यांच्या दु:खाची तर कल्पनाही न केलेली बरी. जे काही घडले आहे, त्याची जबाबदारी जशी पोलिस आणि आरटीओ प्रशासनाची, सरकारी यंत्रणांची आहे, तशीच ती समाजाचा एक घटक या नात्याने आपल्या सगळ्यांचीही आहे.

 

ही वेळ दोष देण्याची नसली तरी घटना का घडली, त्याचा शोध घेतला जाणे आणि त्याबरहुकूम भविष्यात उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी घटनेमागचे कारण शोधून काढले जाते, उपाय सुचविले जातात; मात्र दुर्दैवाने ते अंमलात आणले जात नाहीत. नागरिकांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. गेल्या शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या अपघाताचे कारण शोधण्यासाठीही काम सुरू झाले आहे. अपघातग्रस्त बसच्या चालकाला अटक झाली आहे. Buldhana Bus Accident त्यामुळे चौकशीनंतर खरे कारण पुढे येईलच. पण, हकनाक ज्यांचा बळी गेला त्यांचे जीव कधीही परत येणार नाहीत, हे कटू वास्तव आहे. बघा, चिरीमिरीला पोलिस आणि आरटीओ जेवढे जबाबदार आहेत ना, त्याच्या चौपट जबाबदार आहेत त्यांना लाच देणारे वाहनचालक. वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करूनही पोलिस आणि आरटीओ त्रास देत असतील तर त्याविरुद्ध लढा दिलाच पाहिजे आणि आपल्याकडून चूक झाली असेल तर कायद्यातील तरतुदींनुसार दंड भरला पाहिजे.

 

हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पण, अनेकदा नागरिकही चुका करतात. दंडाची रक्कम भरणे जीवावर येते आणि त्यातून सुटका करवून करण्यासाठी लाच देऊ केली जाते. असेच होत राहिले तर अपघातांची मालिका कधीच खंडित होणार नाही आणि मग त्याची जबाबदारी एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची असेल, हेही कटाक्षाने लक्षात घेतले पाहिजे. Buldhana Bus Accident लाचखोरीसाठी नेहमीच पोलिस आणि आरटीओला जबाबदार धरता यायचे नाही. त्यांच्याही काही मर्यादा आहेत. या मर्यादा सांभाळून त्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडले तर निश्चितपणे अपघातांचे प्रमाण कमी होईल. ही बाब फक्त समृद्धी महामार्गाबाबतीतच नव्हे, तर देशभरातल्या रस्त्यांच्या बाबतीत लागू ठरते.